Chhagan Bhujbal: ओमिक्रॉन विषाणुच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी लसीकरणावर भर द्यावा : छगन भुजबळ

कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे दिड ते दोन वर्षापासून बंद असणाऱ्या शाळा नुकत्याच सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचा हा शैक्षणिक प्रवास नियमितपणे सुरू राहण्यासाठी शिक्षकांनी व पालकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपल्या पाल्यांची योग्यती खबरदारी घ्यावी, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

Chhagan Bhujbal: ओमिक्रॉन विषाणुच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी लसीकरणावर भर द्यावा : छगन भुजबळ
छगन भुजबळ, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 11:18 PM

नाशिक : परदेशात ओमिक्रॉन विषाणूचा प्रसार जलदगतीने होताना दिसत आहे. आपल्या देशातही या विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेता त्यावर वेळीच नियंत्रण मिळविणे आवश्यक असल्याने या विषाणूच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी लसीकरणावर भर देवून लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. आज येवला तालुक्यातील अंदरसूल व निफाड तालुक्यातील कानळद येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, येवला बाजार समितीचे प्रशासक सभापती वसंत पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, ज्येष्ठ नेते किसनराव धनगे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, गयाबाई सुपनर, शिवा सुरासे, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश वाघ, 38 गाव पाणी पुरवठा योजनेचे सचिन कळमकर, प्रा.ज्ञानेश्वर दराडे, अंदरसुलच्या सरपंच सविता जगताप, सरपंच शांताराम जाधव, उपसरपंच झुंजारराव देशमुख, रुक्मिणी पगारे, शिवाजी सूपनर, हरिश्चंद्र भवर, विनोद जोशी, भाऊसाहेब बोचरे, मंगेश गवळी, दत्तात्रय घोटेकर, सचिन दरेकर, योगेश जहागीरदार, मकरंद सोनवणे, संतोष खैरनार, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे, प्रकाश बागल, येवला प्रांत अधिकारी सोपान कासार, निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सिद्धार्थ तांबे, सागर चौधरी, गटविकास अधिकारी शफीक अहमद शेख आदी उपस्थित होते.

ओमिक्रॉनचा सामना करण्यासाठी त्रिसूत्रीचे पालन करणे आवश्यक

कोरोना साथरोगाचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला आहे. आजच्या स्थितीत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ऑक्सिजन व औषधांच्या साठ्याबाबत स्वयंपूर्ण व सुसज्ज आहे. नागरिकांनी कोरोना सोबतच ओमिक्रॉन विषाणूचा सामना करण्यासाठी त्रिसूत्रीचे पालन करणे आवश्यक आहे. देशाचे अर्थचक्र हळूहळू पूर्वपदावर येत असून जनजीवन सुरळीत होत आहे. कोरोना काळात थांबलेल्या विकास कामे पूर्ण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

कोरोना काळात नागरिकांना अन्न धान्याचा पुरेशा प्रमाणात पुरवठा करण्यात आला असून शासनामार्फत राज्यातील गरजूंना शिवभोजन थाळीचा लाभ देण्यात आला आहे. तसेच कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे दिड ते दोन वर्षापासून बंद असणाऱ्या शाळा नुकत्याच सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचा हा शैक्षणिक प्रवास नियमितपणे सुरू राहण्यासाठी शिक्षकांनी व पालकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपल्या पाल्यांची योग्यती खबरदारी घ्यावी, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. (Citizens should focus on vaccination for the prevention of Omicron virus, chhagan bhujbal appeal)

इतर बातम्या

HSC and SSC board exam date : इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, परीक्षा कधीपासून? वाचा सविस्तर

कल्याण-डोंबिवलीत येत्या आठवड्यापासून अनधिकृत बांधकांमावर हातोडा; किती बांधकामे तोडणार?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.