मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच मास्कशिवाय जाहीर कार्यक्रमात भाषण; वाचा काय म्हणाले?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन केलं. यावेळी एक छोटेखानी कार्यक्रम पार पडला. (cm uddhav thackeray address police academy program without mask at nashik)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच मास्कशिवाय जाहीर कार्यक्रमात भाषण; वाचा काय म्हणाले?
cm uddhav thackeray
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 4:18 PM

नाशिक: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन केलं. यावेळी एक छोटेखानी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री पहिल्यांदाच मास्क शिवाय सहभागी झाले. त्यांनी मास्क न घालताच भाषणही केलं. तसेच बऱ्याच दिवसानंतर मास्क काढून बोलत असल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवर्जून सांगितलं. (cm uddhav thackeray address police academy program without mask at nashik)

बऱ्याच दिवसानंतर मास्क काढून मोकळ्या वातावरणात बोलत आहे. मोकळ्या वातावरणात मास्क शिवाय बोलण्याचा माझा हा पहिलाच कार्यक्रम असेल. मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदा नाशिकला आलो होतो. त्यावेळी मी भारावून गेलो होतो. आजही भारावून गेलो आहे. पोलिसांचं संचलन बघूनही भारावलो आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

हॉकी खेळण्याचं वय निघून गेलं

यावेळी त्यांनी अकादमीतील हॉकी मैदानाचीही पाहणी केली. त्यानंतर हाच धागा पकडून त्यांनी कोटी केली. भुजबळ साहेब हॉकी स्टिक वापरामध्ये फरक पडतो. तुम्ही हॉकी जपून वापरा. सरकारमध्ये आल्यावर त्याच हॉकी स्टिकचा व्यवस्थित वापर करता येतो आणि समोर असल्यानंतर हॉकी कशीही वापर करता येते. मलाही क्षणभर वाटलं हॉकी खेळावी. पण ट्रॅकवर उतरल्यानंतर त्याचा जो बाऊन्सिंग इफेक्ट आहे तो बघून लांबूनच बघाव वाटलं. कारण आता हॉकी खेळायचं वय निघून गेलं. आता फक्त उद्घटानं करत फिरायचं आणि पुढच्या पिढीला सुविधा द्यायच्या हेच काम आपल्या हातात आहे, असं मिश्किल उद्गार त्यांनी काढलं.

तुम्हीही गोल्ड मेडल आणा

नीरज चोप्राने गोल्ड मेडल आणलं. प्रत्येकाला वाटतं आपणही मेडल आणावं. आपल्यात ती हिंमत आहे. ते आणू शकतो. पण त्यासाठी सरकारने ताकद दिली पाहिजे. केवळ फिती कापणं आणि नारळ फोडणं हे सरकारचं काम नाही. तुम्ही गोल्ड मेडल आणावं ही आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे. तशीच आम्ही तुम्हाला काही दिलं पाहिजे याचीही तुमची आमच्याकडून अपेक्षा हवी, असं ते म्हणाले. (cm uddhav thackeray address police academy program without mask at nashik)

संबंधित बातम्या:

Mumbai Local : मुंबई लोकल प्रवास करण्यासाठी केवळ दोन डोसच नव्हे, आणखी एक अट पूर्ण करावी लागणार!

रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतराला आजी-माजी विद्यार्थ्यांचा मोठा विरोध, 15 दिवसांत निर्णय घेण्याचे कुलगुरूंचे आश्वासन

महादेव जानकर म्हणतात, मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करतो!, पण अट काय?; वाचा

(cm uddhav thackeray address police academy program without mask at nashik)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.