लोकसभेची ठाकरे गटाच्या जागेवर काँग्रेस आग्रही; ‘त्या’ एका जागेवरुन राष्ट्रवादीची काय असणार भूमिका…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वारीमुळे मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा सुरु आहे तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बैठक घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबत त्यांनी काल भाजपची स्पष्ट भूमिका मांडली.

लोकसभेची ठाकरे गटाच्या जागेवर काँग्रेस आग्रही; 'त्या' एका जागेवरुन राष्ट्रवादीची काय असणार भूमिका...
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 9:12 PM

नाशिक : लोकसभेच्या निवडणुकांची तारीख अजून जाहिर झाली नाही मात्र त्यासाठी आतापासूनच सर्व पक्षांची जय्यत तयारी केली जात आहे. राज्यात शिवसेना-भाजपच सरकार आहे. त्यामुळे एकीकडे शिवसेना भाजप लोकसभाही एकत्रच लढणार असल्याचे नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यासारख्या नेत्यांकडून शिवसेनेच्या जागांवर भाजपने हक्क सांगू नये असं स्पष्टपणे सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्येही लोकसभेच्या जागेवरुन बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं मतही व्यक्त केले जात आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये तसेच चित्र दिसून येत आहे. कारण आता नाशिकच्या एका जागेवर जी जागा पारंपरिकरित्या ठाकरे गटाकडे आहे.

त्या जागेवर आता काँग्रेसने हक्क सांगितल्याने महाविकास आघााडीमध्ये असणारे ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता काय निर्णय घेणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

काँग्रेसकडून राजू वाघमारे यांनी मागणी केली असून आता वरिष्ठ पातळीवर या जागेचा काय निर्णय होणार याची आता उत्सुकता लागून राहिली आहे.

नाशिकमधील दिंडोरी येथील लोकसभेची एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. तर दुसरी एक जागा ठाकरे गटाकडे आहे. या जागेवर ठाकरे गटाकडूनही आपला हक्क बजावला जाऊ शकतो. मात्र तरीही काँग्रेसने लोकसभेची मागणी केल्याने आता नाशिकची जागा नेमकी कुणाला जाणार आहे आता येणारा काळच ठरवणार आहे.

राज्यातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली वारीमुळे मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा सुरु आहे तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर बैठक घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबत त्यांनी काल भाजपची स्पष्ट भूमिका मांडली असल्याचेही भाजपच्या नेत्यांनी सांगितले.

त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाही भाजप-शिवसेना अशा एकत्र होणार की, वेगवेगळ्या पातळीवर लढल्या जाणार याचीही उत्सुकता लोकांना लागून राहिली आहे. त्यातच आता काँग्रेसने नाशिकच्या जागेवर हक्क बजावला असल्याने महाविकास आघाडीत नेमकं काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.