Prithviraj Chavan : महाविकास आघाडी ही कडू गोळी, पण…; पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?

Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाण मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आलेल्या ईडीच्या नोटिशीवरही भाष्य केलं.

Prithviraj Chavan : महाविकास आघाडी ही कडू गोळी, पण...; पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?
महाविकास आघाडी ही कडू गोळी, पण...; पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 4:53 PM

मुंबई: काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी महाविकास आघाडीला (mahavikas agahdi) कडू गोळीची उपमा दिली आहे. महाविकास आघाडी ही कडू गोळी आहे. पण भाजपला हटवायचे असेल तर ही कडू गोळी घ्यावी लागेल याची कल्पना होती म्हणून एकत्र आलो, असं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. दोन पक्षाचे सरकार चालवणे ही तारेवरची कसरत आहे. पण तीन पक्षाचं सरकार स्थापन करण्याचा पहिल्यांदा हा प्रयोग झाल्याने अडचणी होतातच, असंही त्यांनी सांगितलं. महापालिका निवडणुकांवरही (corporation election) त्यांनी भाष्य केलं आहे. महापालिका निवडणुका एकत्र लढायच्या की नाही, हा राज्यपातळीवरचा निर्णय आहे. स्थानिक पातळीवर हे ठरवायचं आहे. महाविकास आघाडी केली तर भाजपाचा सफाया होईल, असं चव्हाण यांनी सांगितलं. चव्हाण यांनी महापालिका निवडणुकीत आघाडी करण्यावर अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे पालिकेत आघाडी एकत्रं येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना आलेल्या ईडीच्या नोटिशीवरही भाष्य केलं. याबाबत कोर्टात लढाई लढू. एखाद्या व्यक्तीने चुकीचे काम केले असेल तर नक्की खटला चालवा. पण तुम्हाला ते करायचं नाही. तुम्हाला फक्त मानहानी करायची आहे. आरोप सिद्ध करा ना? असं आव्हानच चव्हाण यांनी भाजपला दिलं. यावेळी त्यानी संघावरही भाष्य केलं. मोदी आज संघाचे काही ऐकतात का? त्यांचे काही चालतं असं मला वाटत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

मी अजिबात नाराज नाही

मुकुल वासनिक यांना परत महाराष्ट्रातून आणलं तर बरं होईल असं मला देखील वाटलं. मी नाराज आहे असं काही नाही. पण महाराष्ट्रासाठी आनंदी वातावरण होईल असं माझं मत होतं. मी नाराज अजिबात नाही. ही चर्चा संपलेली आहे, असं त्यांनी सांगितलं.

काय निष्पन्न होईल माहीत नाही

राज्यसभेसाठी 6 जागांसाठी 7 अर्ज आले आहेत. कोणाला एकाला पराभूत व्हावं लागेल. काय निष्पन्न होत आहे माहिती नाही. आमचे सगळे मत एकत्र राहतील, असा दावाही त्यांनी केला.

राहुल गांधी त्यांच्या पद्धतीने लढत आहेत

राहुल गांधी यांच्यावरील विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शिंदे साहेब देखील म्हणाले होते की मी पण त्यांना भेटू शकलो नाही. कोरोना काळात भेटलो नाही. ते आपल्या पद्धतीने लढत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या देखील नेतृत्व करत आहेत. कोव्हिडमुळे काँग्रेस अध्यक्ष पद निवडायला वेळ लागला, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.