Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उत्तर महाराष्ट्राला कोरोनाचा दिलासा; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्केंवर

अखेर उत्तर महाराष्ट्राला (North Maharashtra) कोरोनाने (Corona relief) दिलासा दिला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (patient recovery) चक्क 97.32 टक्केंवर गेले आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची भीती तूर्तास तरी काही अंशी कमी झाली आहे.

उत्तर महाराष्ट्राला कोरोनाचा दिलासा; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्केंवर
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 17, 2021 | 11:12 AM

नाशिकः अखेर उत्तर महाराष्ट्राला (North Maharashtra) कोरोनाने (Corona relief) दिलासा दिला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (patient recovery) चक्क 97.32 टक्केंवर गेले आहे. सोबतच लसीकरणही वाढल्याने आता तिसऱ्या लाटेची भीती तूर्तास तरी कमी झाली आहे. (Corona’s relief to North Maharashtra; The patient recovery rate is 97.32 percent)

उत्तर महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन यंत्रणा व आरोग्य यंत्रणेने कंबर कसत उपायोजना राबविली. त्याचे परिणाम आता दिसत आहेत. विभागात आजपर्यंत 9 लाख 71 हजार 125 रुग्णांपैकी 9 लाख 45 हजार 136 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 6 हजार 440 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत विभागात 19 हजार 495 रुग्णांचा मृत्यू झाला असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के आहे, तर मृत्युदर 2.00 टक्के इतका आहे. विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये 65 लाख 49 हजार 375 अहवाल पाठविण्यात आले असून, त्यापैकी 9 लाख 71 हजार 125 अहवाल पॉझिटीव्ह आहेत.

नाशिक, नगरची भीती कमी

नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत 4 लाख 06 हजार 985 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, 3 लाख 97 हजार 449 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 929 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.65 टक्के इतके आहे. आजपर्यंत 8 हजार 607 रुग्णांचा मृत्यु झाला असून जिल्ह्याचा मृत्यूदर 2.11 टक्के आहे . दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत 3 लाख 35 हजार 347 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 3 लाख 23 हजार 173 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 5 हजार 479 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.36 टक्के इतके आहे. नगर जिल्ह्यात आजपर्यंत 6 हजार 695 रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा मृत्यूदर 1.99 टक्के आहे.

धुळे, जळगावमध्येही लाट ओसरली

धुळे, जळगाव जिल्ह्यातही कोरोनाची लाट ओसरली आहे. धुळे जिल्ह्यात आजपर्यंत 45 हजार 870 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, 45 हजार 145 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 05 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.41 टक्के इतके आहे. आजपर्यंत 668 रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा मृत्यूदर 1.45 टक्के आहे. जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 42 हजार 733 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. पैकी 1 लाख 40 हजार 136 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच 20 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.18 टक्के इतके आहे. आजपर्यंत 2 हजार 575 रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा मृत्यूदर 1.80 टक्के आहे.

नंदुरबारमध्येही आशादायी चित्र

नंदुरबार जिल्ह्यातही आशादायी चित्र आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 40 हजार 190 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, 39 हजार 233 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 07 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.61 टक्के इतके आहे. आजपर्यंत 950 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्याचा मृत्यूदर 2.36 टक्के आहे.

विभागात आजपर्यंत 9 लाख 71 हजार 125 रुग्णांपैकी 9 लाख 45 हजार 136 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 6 हजार 440 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत विभागात 19 हजार 495 रुग्णांचा मृत्यू झाला असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के आहे, तर मृत्युदर 2.00 टक्के इतका आहे. विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये 65 लाख 49 हजार 375 अहवाल पाठविण्यात आले असून, त्यापैकी 9 लाख 71 हजार 125 अहवाल पॉझिटीव्ह आहेत. – डॉ. पी. डी. गांडाळ, आरोग्य उपसंचालक, नाशिक परिमंडळ कार्यालय (Corona’s relief to North Maharashtra; The patient recovery rate is 97.32 percent)

इतर बातम्याः

सुखवार्ताः अमेरिकन क्रिकेट प्रीमिअर लीगमध्ये नाशिकच्या नीरजची निवड

नाशिकमध्ये मतदार यादी शुद्धीकरण मोहीम सुरू; तब्बल 2 लाख 87 हजार नावे दुबार

महापालिका निवडणुकीपूर्वी राज ठाकरे सक्रिय; 21 सप्टेंबर पासून नाशिक दौऱ्यावर

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.