Special Report : सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून देवेंद्र फडणवीस यांची खेळी; उद्धव ठाकरे यांनीसुद्धा फिरवलं असं चक्र
ठाकरे गटानंही भाजपच्यात गोटातला उमेदवार आपल्या गटात खेचला. सकाळी शुभांगी पाटील मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आल्या. शुभांगी पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली.
मुंबई : सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठी खेळी केली. आता उद्धव ठाकरे यांनीसुद्धा चक्र फिरवली आहेत. भाजपच्याच उच्छुक उमेदवाराला ठाकरे यांनी आपल्या गोटात घेतलं. त्यामुळं नाशिकची (Nashik) पदवीधर निवडणूक सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील अशी होणार आहे. लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीत जशा नाट्यमय घडामोडी घडतात, तशा घडामोडी नाशिकच्या पदवीधर निवडणुकीत झालं. सत्यजित तांबे यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शुभांगी पाटील (Shubhangi Patil) मैदानात आहेत.
शुभांगी पाटील ठाकरे गटाच्या उमेदवार
सुधीर तांबे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज मिळूनही अर्ज दाखल केला नाही. मुलगा सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. दुसरीकडं स्वतःला भाजपच्या उमेदवार सांगणाऱ्या शुभांगी पाटील आता ठाकरे गटाच्या उमेदवार झाल्या.
नाशिकमधील फाईट निश्चित झाली आहे. सत्यजित तांबे अपक्ष आहेत. पण, त्यांना भाजपचा पाठिंबा मिळण्याची शक्यता अधिक आहे. ठाकरे गटाकडून शुभांगी पाटील मैदानात आहेत. त्यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा असेल.
सत्यजित तांबे यांनी मागितला भाजपचा पाठिंबा
सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यानंतर महाविकास आघाडीनंही तोडीस तोड उमेदवार शोधलाय. सत्यजित तांबे यांनी भाजपचा पाठिंबा मागितल्यानं ते भाजपचा उमेदवार असल्याची चर्चा सुरू झाली.
ठाकरे गटानंही भाजपच्यात गोटातला उमेदवार आपल्या गटात खेचला. सकाळी शुभांगी पाटील मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आल्या. शुभांगी पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली. महाविकास आघाडीनं पहिली महिला पदवीधर देण्यासाठी पाठबळ दिल्याचं सांगितलं.
राजा का बेटा राजा नहीं बनेगा
शुभांगी पाटील म्हणाल्या, राजा का बेटा राजा नहीं बनेगा. जिसमे काबिलीयत हैं हो राजा बनेगा. सत्यजित तांबे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. कारण काँग्रेसनं सत्यजित तांबे यांना पाठिंबा नाही, हे स्पष्ट केलंय.