Malegaon | गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा…
नांदगाव-मालेगाव तालुक्यात असलेल्या गिरणा धरणातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झालीयं. आज सकाळी 6.00 वाजता धरणाचे 2 वक्रद्वारे 2 फुटने आणि 4 वक्रद्वारे 1 फुटने उघडण्यात आली असून त्यातून नदीपात्रात एकूण 9 हजार 504 क्यूसेस वेगाने गिरणा नदीत पाण्याच्या विसर्ग सुरू आहे.
मालेगाव : नाशिक (Nashik) जिल्हामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने संततधार पाऊस सुरूयं. यामुळे जिल्हातील जवळपास धरणे ओव्हर फ्लो झाली असून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलायं. इतके नाही तर सततच्या पावसामुळे आणि धरणातून पाणी (Water) सोडल्याने नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून अनेक नद्यांना पूर देखील आलायं. यामुळे प्रशासनाने नदी काठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलायं. मात्र, या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान (Damage) झाले. गिरणा धरणातून देखील आता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलायं.
गिरणा धरणातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ…
नांदगाव-मालेगाव तालुक्यात असलेल्या गिरणा धरणातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झालीयं. आज सकाळी 6.00 वाजता धरणाचे 2 वक्रद्वारे 2 फुटने आणि 4 वक्रद्वारे 1 फुटने उघडण्यात आली असून त्यातून नदीपात्रात एकूण 9 हजार 504 क्यूसेस वेगाने गिरणा नदीत पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
9 हजार 504 क्यूसेस पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सुरू
गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होताना दिसते आहे. नदीपात्रात एकूण 9 हजार 504 क्यूसेस वेगाने पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. यामुळे प्रशासनाने नदी पात्रात कोणीही उतरूनये असे आवाहन केले आहे. तसेच नदीच्या काठच्या गावांनी सतर्क राहवे असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम राहिला तर पाण्याचा अजून विसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.