अखेर ज्याची भीती होती तेच घडलं, नाशिकमध्ये भाजप आणि ठाकरे गटात मोठा राडा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला गालबोट लागू नये यासाठी पोलीस प्रशासन प्रचंड अलर्टवर आहे. मतदानाला अवघे आता 5 दिवस बाकी राहिले आहे. अशा परिस्थितीत नाशिकमध्ये भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलिसांनी सध्यस्थितीत आता परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती आहे.

अखेर ज्याची भीती होती तेच घडलं, नाशिकमध्ये भाजप आणि ठाकरे गटात मोठा राडा
Follow us
| Updated on: Nov 15, 2024 | 4:37 PM

नाशिकमध्ये भाजप आणि ठाकरे गटात मोठा राडा झाला आहे. नाशिकच्या अंबड पोलीस स्थानकाबाहेर गोंधळाचं वातावरण आहे. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतादारांच्या स्लीप वाटपातून वाद झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात असलेल्या सावता नगर परिसरात दोन गटात वाद झाला. भाजप आणि ठाकरे गटाच्या समर्थकांनी अंबड पोलीस ठाणे बाहेर मोठी गर्दी केली आहे. अंबड पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केल्याची देखील माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर हे देखील पोलीस ठाण्यात दाखल झाले. पण पोलिसांनी त्यांना परतण्याचं आवाहन केल्यानंतर ते परत गेले. मोठमोठे पोलीस अधिकारी अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाले. कार्यकर्त्यांची भलीमोठी गर्दी पाहता सुरक्षेची सर्व काळजी पोलिसांकडून घेण्यात येत आहे. कार्यकर्त्यांना परत घेऊन जा, असंदेखील आवाहन पोलिसांनी केल्याची माहिती आहे.

नेमकं काय घडलं?

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांचे समर्थक मतदार स्लीप वाटत होते. या दरम्यान ठाकरे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. यावेळी दोन्ही बाजूने वाद झाला. प्रचंड भांडण सुरु झालं. वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही बाजूने हाणामारी सुरु झाली. या हाणामारीत सुधाकर बडगुजर यांचा कार्यकर्ता जखमी झाला आहे. या घटनेनंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते अंबड पोलीस ठाण्याबाहेर आले. यावेळी भाजपचे देखील कार्यकर्ते पदाधिकारी अंबड पोलीस ठाण्याबाहेर आले आहेत.

हे सुद्धा वाचा

दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते अंबड पोलीस ठाण्याबाहेर आल्याने मोठा गोंधळ उडाला. कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सर्व काळजी घेतली जात आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा अंबड पोलीस ठाण्याबाहेर तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे नाशिकमध्ये कालदेखील अशाचप्रकारचा राडा झाला होता. तो राडा भाजप आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा राडा झाल्याचं चित्र आहे.

खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.