नाशिकमध्ये जोरदार राडा, आजी-माजी आमदार एकमेकांना भिडले

राज्यभरात लोकशाहीचा एवढा मोठा सण साजरा होत असताना नाशिकमध्ये एक अनपेक्षित बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये आजी-माजी आमदारांमध्ये जोरदार राडा झाला आहे. या वादाचा व्हिडीओदेखील आता समोर आला आहे.

नाशिकमध्ये जोरदार राडा, आजी-माजी आमदार एकमेकांना भिडले
Follow us
| Updated on: May 20, 2024 | 7:51 PM

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा आज शेवटचा टप्पा पार पडला. राज्यातील धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील 6 मतदारसंघ अशा एकूण 13 मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडलं. दिवसभरात मतदान सुरु असताना वेगेवगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घडामोडी घडल्या आहेत. काही ठिकाणी मतदारकेंद्रांवर मतदारांच्या तासंतास लांब रांगा लागल्या. काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याचा प्रकार बघायला मिळाला. काही ठिकाणी नागरिकांनी निवडणूक प्रतिनिधींकडून दिरंगाई केला जात असल्याचा आरोप केला. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यावरुन निवडणूक आयोग आणि मोदी सरकारवर निशाणा साधलाय. भिवंडी लोकसभा मतदारसंघात तर हजारो नागरिकांचे नाव मतदार यादीतून गायब झालं आहे. या सगळ्या घटनांसोबतच नाशिकमध्येही एक अनपेक्षित घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये आजी-माजी आमदार एकमेकांना भिडले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

महाराष्ट्राची सुसंस्कृती अशी राजकीय संस्कृती मानली जाते. महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र मानला जातो. पण याच महाराष्ट्राच्या नाशिक सारख्या शहरात आजी-माजी आमदारांमध्ये जोरदार वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे मतदानाच्या दिवशीच हा वाद झाला आहे. त्यामुळे हे लोकशाहीला शोभणारं नाही, अशी चर्चा सामान्यांमध्ये सुरु आहे. नाशिकमधील भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे आणि माजी आमदार वसंत गीते यांच्यात जोरदार राडा झालाय. फरांदे आणि गीते यांच्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. देवयानी फरांदे यांना शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी आता पोलिसांकडून काय कारवाई केली जाते? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

परिसरात पोलिसांचा फौजफाटा वाढला

देवयानी फरांदे आणि वसंत गीते यांच्यात झालेल्या राड्याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरली होत आहे. दोघांच्या वादानंतर नाशिकच्या मध्य विधानसभा मतदारसंघात तणावपूर्ण वातावरण आहे. नाशिक पोलिसांकडून नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.