लोकसभेचा बार उडण्याआधीच धुसफूस; ‘या’ लोकसभा मतदारसंघावरून शिंदे-भाजपमध्ये जुंपली

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिंदेगट, अजितदादा गट आणि भाजपने महायुती म्हणून एकत्रितपणे निवडणुकांना समोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. असं असताना एका मतदारसंघावरून दोन्ही पक्षात मिठाचा खडा पडला आहे. एका मतदारसंघात शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांनी दावा केला आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

लोकसभेचा बार उडण्याआधीच धुसफूस; 'या' लोकसभा मतदारसंघावरून शिंदे-भाजपमध्ये जुंपली
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 21, 2023 | 3:23 PM

जळगाव | 21 डिसेंबर 2023 : लोकसभा निवडणुकांना अद्याप अवकाश आहे. मात्र लोकसभेच्या जागेवरून जळगावात स्थानिक पातळीवर आतापासूनच भाजप आणि शिंदे गटांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. जळगाव लोकसभेच्या जागेवरून भाजपचे आमदार सुरेश भोळे आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील हे आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. दोघांनीही जळगाव लोकसभेच्या जागेवर दावा केल्याने आगामी काळात महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये तीन आमदार हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत. तर 15 पंचायत समित्या या शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहेत. या संख्याबळाचा विचार केल्यास वरिष्ठ पातळीवरून जळगाव लोकसभेची जागा ही शिंदे गटाला मिळेल. आतापर्यंत आम्ही युतीधर्म पाळत आलो आहे. त्यामुळे आता भाजपने यावेळी आम्हाला मदत करावी, असं वक्तव्य करत शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांनी जळगाव लोकसभेच्या जागेवर दावा केला आहे.

भोळेही मैदानात

दरम्यान, भाजपचे आमदार सुरेश भोळे यांनीही जळगाव लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे. विद्यमान खासदार हे सुद्धा भाजपचेच आहेत. त्यामुळे जळगाव लोकसभेची जागा ही भाजपलाच मिळेल, असा विश्वास आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केला आहे. तर काही कार्यकर्ते हे अतिउत्साही असतात त्यामुळे ते अशा प्रकारचे वक्तव्य करत असतात. पक्षश्रेष्ठींशी चर्चा करूनच अशा प्रकारचे वक्तव्य करावे, असे म्हणत आमदार सुरेश भोळे यांनी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांना चिमटा काढला आहे.

नेत्यांची डोकेदुखी वाढणार

लोकसभेच्या जागांबाबत अद्याप वरिष्ठ पातळीवर महायुतीमध्ये कुठलाही निर्णय झालेला नाही. असं असताना जळगाव लोकसभेच्या जागेवर आतापासूनच शिवसेना शिंदे गट आणि भाजपने दावा केल्यामुळे आगामी काळात याच जागेवरून भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यताही आहे. वरिष्ठ नेते या जागेबाबत काय निर्णय घेतात याकडेही सर्वांचंं लक्ष लागलं आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.