सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमात महिलांचा लाडू आणि चिवड्यावरून वाद, पाहा VIDEO
नाशिकच्या परशुराम सायखेडकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमादरम्यान महिलांमध्ये लाडू चिवड्यावरून वाद झाला. यावेळी सुप्रिया सुळेंच्या प्रमुख उपस्थितीत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर बाहेर पडताना महिलांमध्ये राडा झाला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमात महिलांचा लाडू वरुन वाद झाल्याचं बघायला मिळालं. नाशिकच्या परशुराम सायखेडकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमादरम्यान महिलांमध्ये लाडू चिवड्यावरून वाद झाला. यावेळी सुप्रिया सुळेंच्या प्रमुख उपस्थितीत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर बाहेर पडताना महिलांमध्ये राडा झाला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. महिला कशाप्रकारे पिशवींची ओढाओढ करत आहेत ते दिसत आहे.
नाशिकमध्ये सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमात महिलांचा लाडू वरून वाद #Nashik pic.twitter.com/GaYRVVvO3C
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 19, 2024
सुप्रिया सुळे महिला मेळाव्याच्या भाषणात काय म्हणाल्या?
“शहरातील सगळे महिला मेळावे यापुढे साडेपाच वाजेच्या आत घ्या”, असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांना दिला. “सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना आणली. तुमच्या भवितव्यासाठी योजना नाही, त्यांच्या स्वार्थासाठी. कोण मुख्यमंत्री, लाडकी बहीण म्हणतो कोण, लाडकी बहीण म्हणतो मला नेमकं नाव माहिती नाही”, असा टोला सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
“सगळे प्रश्न पैशाने सुटत नाहीत. ते घाबरले आहेत. दिवाळीच्या आधी अणखी 5 हजार देतील. दिवाळीच्या आधी पैसे काढून घ्या. यांचा काही भरोसा नाही. जिल्हा बँकेतील फक्त एका व्यक्तीवर कारवाई केली. इतर 12 लोकांवर कारवाई नाही. कारण ते सत्तेत 12 लोकांवर कारवाई केली नाही. सगळ्यांना सारखा न्याय आम्ही देऊ. गरिबांचे पैसे डुबवले असेल तर कोर्टात जाऊन सुप्रिया सुळे न्याय मिळवून देईल. पक्ष आणि चिन्ह गेलं, नाशिकमध्ये आल्यावर कळलं, जेलमध्ये जाणार होते. त्यातून वाचविण्यासाठी गेले”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर केली.
“भगरे सर आणि मी प्रामाणिकपणे होतो म्हणून निवडून आलो. आम्ही मोडू पण वाकणार नाही. आता लढाई वैचारिक आणि नैतिकतेची आहे. लढाई संपलेली नाही, पक्ष साहेबांच्या हातून घेतला. मी अजूनही मी कोर्टाची पायरी चढते, मी अदृश्य शक्तीला घाबरत नाही. सगळ्या संस्थांची सत्ता त्यांच्याकडे होती. पण आमच्याकडे जनतेची ताकद होती. बहिणींनी प्रेमाने मागितले असते तर सगळं देऊन टाकले असते. त्यांना बहिणीचं नातं कळलं नाही”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“आम्ही 1500 ला नाते विकणारे नाही. लाडकी बहीण जाहिरातीसाठी 200 कोटी खर्च केले. शून्य किती माहिती नाही, आमच्या महिला कच्च्या आहेत. 200 कोटी कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्याला आणि अंगणवाडी सेविका, आशा भगिणिंना द्या. आशा सेविकांना 5 हजार दिले नाही तर सुप्रिया सुळे आंदोलनाला बसणार”, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला.