आमची किडनी विका, पण रस्ते करा; हतबल जळगावकरांची महापालिकेकडे आर्त विनवणी

आमची किडनी विका, पण चाळणी झालेले रस्ते (Bad roads) लवकरात लवकर दुरुस्त करा, अशी आर्त विनवणी जळगावकरांनी (Jalgaon) महापालिकेच्या (Municipal Corporation) अतिरिक्त आयुक्तांकडे केली आहे.

आमची किडनी विका, पण रस्ते करा; हतबल जळगावकरांची महापालिकेकडे आर्त विनवणी
आमची किडनी विका, पण रस्ते दुरुस्त करा, अशी मागणी नागरिकांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडे केली आहे.
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 4:57 PM

नाशिकः आमची किडनी विका, पण चाळणी झालेले रस्ते (Bad roads) लवकरात लवकर दुरुस्त करा, अशी आर्त विनवणी जळगावकरांनी (Jalgaon) महापालिकेच्या (Municipal Corporation) अतिरिक्त आयुक्तांकडे केली. तर दुसरीकडे काही सजग नागरिकांनी रस्ते दुरुस्तीसाठी कोर्टाची पायरी चढायची तयारी सुरू केली आहे. (Sell ​​our kidneys, but do the roads, the demand of the citizens of Jalgaon to the Municipal Corporation)

जळगाव सोन्याची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, इथल्या रस्त्यांची दैना उडाली आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. शहरातील गणेश कॉलनी चौक, ख्वाजामिया चौक, कौर्ट चौक, चित्रा चौक, टॉवर चौक, नेरी नाका चौक, अजिंठा चौक, पिंप्राळा रेल्वे गेट, सिंधी कॉलनी, बेंडाळे चौक, पांडे चौक, इच्छादेवी चौक, शिवाजीनगर उड्डाणपूल, दूध फेडरेशन, अण्णा नगर भागातल्या रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली आहे. त्यामुळे शहवारीय हैराण झाले आहेत. त्यांनी महापालिकेकडे अनेकदा रस्ते दुरुस्तीची मागणी केली. मात्र, या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली. शेवटी वैतागलेल्या नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली अनोखे आंदोलन केले. त्यांनी महापालिकेत धडक दिली. ‘आमची किडनी विका, त्यातून आलेल्या पैशातून रस्ते करा,’ अशी आर्त विनवणी अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड यांच्याकडे केली.

कोर्टात जाणार

काही दिवसांपूर्वी रस्ता खचून कार पलटी झाली. यात कारचालकाला दुखापत झाली.  रस्त्यावरून चालताना एका ट्रॅक्टरचे चाक खराब रस्त्यांमुळे निखळले होते. त्यामुळे जळगावकरांना घराबाहेर पडायचे म्हटले, तरी अंगावर काटा येतो. इतकी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या त्रासाला कंटाळून काही सजग नागरिक कोर्टात याचिका दाखल करण्याचा पर्याय चाचपडून पहात आहेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मागणी करूनही रस्ते करत नाही. निदान कोर्टाच्या आदेशानंतर तरी रस्ते तयार होतील, अशी अशा या नागरिकांना आहे.

नाना विकार जडले

जळगावमधली रस्त्यांची चाळणी झाली आहे. अनेक भागातल्या रस्त्यांमध्ये एकेक फूट खोलीचे खड्डे आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. किरकोळ अपघात वाढले आहेत. विशेषतः नागरिकांना पाठदुखी, मणके दुखीचे विकार जडत आहेत. अनेक नोकरदारांना कामानिमित्त दिवसभर दुचाकीवर फिरावे लागते. एकीकडे नोकरी सोडता येत नाही आणि दुसरीकडे रस्त्यावरून फिरताना जीव नकोसा होतो, अशा कोंडीत ते सापडले आहेत. . (Sell ​​our kidneys, but do the roads, the demand of the citizens of Jalgaon to the Municipal Corporation)

इतर बातम्याः

लॉटरी लागली लॉटरी…सोने 900 रुपयांनी स्वस्त…जाणून घ्या नाशिकमधील भाव

चंचल वारा, या जलधारा…नाशिकमध्ये ऊन-पावसाचा खेळ…पुढचे दोन दिवस सोहळा!

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.