नाशिक: राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)तुरुंगात आहेत. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात त्यांना अजूनही जामीन मिळालेला नाही. त्यावरून राष्ट्रवादीच्या (ncp) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बाकी लोक बोलणार नाहीत. पण मी बोलेल. फार फार काय होईल तर रेड पडेल. पण मी बोलणारच. अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयावर 109 वेळा रेड पडली. हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. हा खूप सीरियस इश्यू आहे. चार्टड अकाऊंट संघटनेला पण नोटीस बाजवली जाते. तुम्ही बाहेर बोलत जाऊ नका म्हणून त्यांना सांगितलं जातं, असा गंभीर आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. एलोरा, अजिंठा आणि ताजमहल हे आपलं आश्चर्य आहे. आपलं वैभव आहे. ताजवरून वाद होणं योग्य नाही. विनाकारण वाद होता कामा नयेत, असं त्यांनी सांगितलं.
सुप्रिया सुळे या मीडियाशी संवाद साधत होत्या. काल मी पुरंदरला होते आणि मी खूप शॉक झाले. एकाचा सत्कार केला. त्यात हडपसरचा एक तरूण होता. बोलता बोलता तो म्हणाला की, मी लंडनला आता जाणार आहे. लंडनला तीन महिन्यासाठी जाणार आहे. पाच महिन्याचं काँट्रॅक्ट आहे. टुरिझम वाढावा म्हणून लंडनने आम्हाला टॅक्समध्ये सवलत दिली आहे. हे ऐकून मला खूप शॉक बसला. आपल्या लोकांना दुसऱ्या देशात जावे लागत आहे. आज खूप बाबतीत आपला देश मागे आहे, लिडरशीप ही सत्तेतून येत नाही, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.
आमचे आयुष्य म्हणजे 24 बाय 7 जॉब आहे. मार्च एप्रिलमध्ये तर ते खूपच तणावात असतात. पार्लमेंटमध्ये काम करताना जाणवते की, पैशांचे सोंग आणता येत नाही. बाकी सगळे आणता येतं. गव्हाबाबत आता जो निर्णय झाला तो विशेष आहे. श्रीलकेत जस झालं हे आपल्याकडे होणार नाही हा विश्वास आहे. पण महागाईचा प्रश्न आपण गंभीर्याने घ्यायला हवा, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
मी आल्यापासून सगळे म्हणतायत की नाशिकमध्ये तुम्ही आलात आणि मिसळ नाही खाल्ली. त्यामुळे मला खावी लागली. सगळ्यात चांगली मिसळ कुठे मिळते तर नाशिकमध्ये. नाशिक हा ब्रँड झालाय मिसळीचा. चहाच्या दुकानाला तर आता आमदार चहा, खासदार चहा काहीही नावे देतात, असंही ते म्हणाले.
भोंगा म्हणजे करायला गेले एक आणि झाले दुसरे… करायला काय गेले आणि शिर्डीतला भोंगा पहिले काढावा लागला. कोरोना काळात सेवा देतांना कोणी जात बघितली का? सिप्ला कंपनी देखील हमीदची आहे, असंही त्या म्हणाल्या.