मास्तराच्या मुलाची संपत्ती हजार बाराशे कोटींची कशी?, त्यांची चौकशी का होत नाही?; नाथाभाऊंचा सवाल

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. ज्यांचे वडील मास्तर होते. (eknath khadse)

मास्तराच्या मुलाची संपत्ती हजार बाराशे कोटींची कशी?, त्यांची चौकशी का होत नाही?; नाथाभाऊंचा सवाल
eknath khadse
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 7:41 PM

जळगाव: राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. ज्यांचे वडील मास्तर होते. त्यांनी हजार बाराशे कोटींची संपत्ती जमवली. त्यांची चौकशी का होत नाही?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळे खडसे आणि महाजन यांच्यात पुन्हा जुंपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर ईडीने कारवाई केल्याच्या चर्चेला उधाण आले होते. दरम्यान आज एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे एका कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याप्रसंगी बोलताना खडसे यांनी आता ईडीचा काहीही संबंध राहिला नसल्याचे म्हटले आहे. याबाबत न्यायालयात खटला दाखल केला असल्याचे त्यांनी सांगितलं. तसेच यावेळी आपल्याबद्दल अपप्रचार करणाऱ्या विरोधकांना खडसे यांनी धारेवर धरले असून गिरीश महाजन यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे.

ईडीशी माझा संबंध राहिला नाही

माझे स्वतःचे घर वाडे होते. मात्र ज्यांचे वडील मास्तर होते. त्यांनी हजार बाराशे रुपयांची प्रॉपर्टी जमवली. त्यांची चौकशी का होत नाही? असा सवाल त्यांनी महाजन यांचं नाव न घेता केला आहे. नाथाभाऊचा आता ईडीशी काहीच संबंध राहिलेला नाही. याबाबत कोर्टामध्ये दावा दाखल झाला आहे. आता बोलायचंच असेल तर कोर्ट बोलवेल. ईडी बोलावणार नाही. त्यामुळे आता ईडीशी संबंध राहिला नसल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. मात्र नाव खराब करण्यासाठी विरोधक जिवाचं रान करत असून नाथाभाऊची ताकद माहिती असल्याने विरोधक अशा प्रकारचे कृत्य करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

घोटाळा उघड केल्याचं दुखणं

भाईचंद हिराचंद रायसोनी सोसायटीचा घोटाळा मी उघड केला. विरोधकांचे खरे दुखणे हे असून त्यामुळे विरोधक माझ्यावर आरोप-प्रत्यारोप करत असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

भाजपच्या 11 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, पण धक्का कुणाला?

दरम्यान,खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपचा गड असलेल्या जळगावात भाजपला मोठे धक्के बसत आहेत. 24 सप्टेंबर रोजी बोदवडमधील 11 नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलं. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या 11 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. महत्वाची बाब म्हणजे हे नगरसेवक एकनाथ खडसे समर्थक होते. त्यामुळे हा धक्का नेमका कुणाला? अशी चर्चा आता जळगावच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळतेय.

भाजपच्या बोदवडच्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि त्यांच्यासोबत 11 नगरसेवक यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर विश्वास ठेवत भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केलाय. पूर्वी मुक्ताईनगरचे 6 नगरसेवक शिवसेनेते दाखल झाले होते. मुक्ताईनगरचे गटनेतेही शिवसेनेत दाखल झाले आहेत. याचाच अर्थ तिथल्या आमदारांनी केलेली कामं आणि जनतेचा मिळवलेला विश्वास आणि उद्धव साहेबांच्या कामगिरीवर विश्वास ठेवून त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केलाय. येणाऱ्या काळात मुक्ताईनगर जिल्हा परिषदेमध्येही अशीच स्थिती राहील, असा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलाय.

संबंधित बातम्या:

आता सरपंचालाही ईडीची नोटीस आली तर नवल वाटू नये; यशोमती ठाकूर यांचा बोचरा वार

…तर आता रेल्वे त्यांच्या 94 शाळा बंद करणार, जाणून घ्या योजना काय?

फडणवीसांचा पाहणी दौरा आणि पंकजा मुंडे अचानक ‘अनवेल’, राजकीय चर्चेला तोंड फुटलं

(eknath khadse attacks ed over girish mahajan property)

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.