चलो अयोध्या… 34 वर्षापूर्वीचं पत्रक व्हायरल, नाथाभाऊंचंही नाव; कसा होता कार्यक्रम?

अयोध्येत उद्या राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला देशविदेशातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याची जय्यत तयारी झाली आहे. त्यामुळे या सोहळ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे. या निमित्ताने कारसेवेच्या आठवणीही जाग्या होताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कारसेवेला जात असतानाचा रेल्वे स्थानकावरील फोटो व्हायरल केला. त्यानंतर नाथाभाऊंनीही त्यांचा...

चलो अयोध्या... 34 वर्षापूर्वीचं पत्रक व्हायरल, नाथाभाऊंचंही नाव; कसा होता कार्यक्रम?
eknath khadseImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 21, 2024 | 3:32 PM

रवी गोरे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, जळगाव | 21 जानेवारी 2023 : कारसेवेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली आहे. तर दुसरीकडे एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातही जुंपली आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांनी आपण अयोध्येत कारसेवेला गेल्याचा दावा केला आहे. तर तुम्ही कारसेवेला जायला तुमचं वय काय होतं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना केला आहे. त्यामुळे फडणवीस यांनी कारसेवेला गेल्याचा पुरावाच सादर केला आहे. तर, मी बदायूंच्या तुरुंगात होतो, महाजन यांचं माहीत नाही, असं नाथाभाऊंनी म्हटलं आहे. आता तर नाथाभाऊंनी कारसेवेला गेल्याची एक 34 वर्षापूर्वीचं पत्रकच व्हायरल केलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनीही कारसेवक असल्याचा पुरावा दिला आहे. एकनाथ खडसे यांनी 1990मधील एक पत्रिका दाखवली आहे. त्यात आमदार एकनाथ खडसे असा नाथाभाऊंचा उल्लेख आहे. या पत्रिकेत जळगाव जिल्ह्यातील कारसेवकांची नावे आहेत. त्यात नाथाभाऊंचं नाव आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर कारसेवला जात असतानाच फोटो टाकताच खडसेंकडूनही कारसेवक म्हणून उल्लेख असलेली पत्रिका व्हायरल करण्यात आली आहे.

का आहे पत्रिकेत?

ही पत्रिका 34 वर्षापूर्वीची आहे. श्रीराम कार सेवा समिती आणि विश्व हिंदू परिषदेने हे पत्रक काढलं आहे. या पत्रकारवर चलो अयोध्येचं आवाहन करण्यात आलं आहे. या पत्रिकेत 19 सप्टेंबर 1990 ते 7 ऑक्टोबर 1990पर्यंतचा कार्यक्रम देण्यात आला आहे. 15 सप्टेंबर 1990 ते 25 सप्टेंबर 1990 पर्यंत जनसंकल्प दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात सभा, युवक मेळावे, महिला मेळावे आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तर 29 सप्टेंबर 1990 रोजी म्हणजे विजया दशमीच्या दिवशी विजय यात्रा समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दिवशी प्रत्येक तालुक्यातून विजययात्रा काढण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. तर, 29 सप्टेंबर 1990 ते 7 ऑक्टोबर 1990 दरम्यान श्री प्रभू राम ज्योती यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं.

 kar seva card

kar seva card

या पत्रिकेतून कारसेवा नोंदणीचं आवाहनही करण्यात आलं होतं. तसेच जिल्ह्यातील कारसेवा समिती सदस्यांची यादीही देण्यात आली होती. या यादीत आमदार एकनाथराव खडसे असा खडसे यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मुक्ताईनगरमधील एकमेव कारसेवक म्हणून एकनाथ खडसे यांचा या पत्रिकेत उल्लेख आहे. तब्बल 34 वर्षांपूर्वीची ही पत्रिका आहे. ही पत्रिका प्रचंड व्हायरल होत आहे. यावरून एकनाथ खडसे हे कारसेवक होते आणि ते कारसेवेला गेल्याच्या चर्चांना बळ मिळत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.