Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहिराणी भाषेत आमदारकीची शपथ घेणाऱ्या खान्देशातील पहिल्या आमदाराचं निधन; मुलुख मैदानी तोफ थंडावली

खान्देशची मुलुख मैदान तोफ थंडावली आहे. माजी आमदार आणि बुजुर्ग नेते गुलाबराव वामनराव पाटील यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. मृत्यू समयी ते 90 वर्षाचे होते. त्यांच्या निधनावर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे.

अहिराणी भाषेत आमदारकीची शपथ घेणाऱ्या खान्देशातील पहिल्या आमदाराचं निधन; मुलुख मैदानी तोफ थंडावली
gulabrao patil Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 23, 2023 | 9:48 AM

जळगाव | 23 ऑगस्ट 2023 : अहिराणी भाषेत आमदारकीची शपथ घेणारे खान्देशातील पहिले आमदार, खान्देशची मुलुख मैदानी तोफ, वयोवृद्ध नेते गुलाबराव वामनराव पाटील यांचं निधन झालं. ते 90 वर्षाचे होते. मंगळवारी रात्री वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधानावर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. गुलाबराव पाटील यांना जनता दलाचे आमदार म्हणून 13 वर्ष काम पाहिलं होतं. त्यांच्या निधनाने खान्देशातील जुनं जाणतं नेतृत्व हरपलं आहे.

अख्या महाराष्ट्रात मुलूख मैदान तोफ म्हणून प्रचलित असलेल्या अमळनेर तालुक्याचे माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील (वय 90) यांचे मंगळवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी 2 वाजता दहिवद (ता. अमळनेर) येथील त्यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे. मायबोली अहिराणीतूनच शपथ घेणारे ते पाहिले आमदार होते. विधानसभेत सत्ताधाऱ्यांना वेठीस धरून त्यांना सळो की पळो करून सोडण्यात ते वाकबगार होते. त्यांच्या भाषणांनी त्यांनी विधानसभाच नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्र गाजवून सोडला होता. त्यामुळे मुलुख मैदानी तोफ म्हणून त्याची ख्याती पसरली होती.

हे सुद्धा वाचा

सतत चर्चेत असायचे

गुलाबराव पाटील हे तीन वेळा निवडून आले. एकूण 13 वर्षे ते जनता दलाचे आमदार होते. शेतकर्‍यांसाठी शिंगाडे मोर्चा काढणे, सभागृहातून राजदंड पळवणे आदी कारणांमुळे ते सतत चर्चेत राहायचे. ते समाजवादी विचारसरणीचे होते. त्यांचा महाराष्ट्रभरात दरारा होता. फर्डे वक्ते म्हणूनही ते परिचित होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘साची संदेश’ दैनिकात पत्रकार म्हणून काम पाहिले होते. दीर्घ काळ जनता दलात राहिल्यानंतर राजकीय जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील समाजवादी विचारसरणीच्या दमदार फळीतील शेवटचा नेता निखळला आहे.

बुलंद आवाज हरपला

दरम्यान, पाटील यांच्या निधनावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. अमळनेर तालुक्याचे माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील यांच्या निधनानं सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारा, त्यासाठी विधानसभेत उठणारा बुलंद आवाज हरपला आहे. राजकारणापलीकडे मैत्री जपणारं एक मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!, असं अजित पवार यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे.

बीड पॅटर्नची पुनरावृत्ती, रस्त्यावर नग्नावस्थेत आढळला मृतदेह
बीड पॅटर्नची पुनरावृत्ती, रस्त्यावर नग्नावस्थेत आढळला मृतदेह.
खोक्याला पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला?
खोक्याला पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला?.
स्वारगेट अत्याचार प्रकरण; दत्ता गाडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
स्वारगेट अत्याचार प्रकरण; दत्ता गाडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
धंनजय मुंडेंचं मंत्रिपद कोणाला मिळणार? अजित पवारांकडून मोठी खेळी
धंनजय मुंडेंचं मंत्रिपद कोणाला मिळणार? अजित पवारांकडून मोठी खेळी.
मल्हार मटन म्हणून तुम्ही देवांचा अपमान करणार का? आव्हाडांचा प्रश्न
मल्हार मटन म्हणून तुम्ही देवांचा अपमान करणार का? आव्हाडांचा प्रश्न.
नाराजीच्या बातम्यावरून सुधीरभाऊंनी गाणंच गायलं, 'तुझसे नाराज नहीं..'
नाराजीच्या बातम्यावरून सुधीरभाऊंनी गाणंच गायलं, 'तुझसे नाराज नहीं..'.
इतिहास शिकून घ्या, मुस्लिमांबद्दलच्या विधानावरून दादांचा राणेंना सल्ला
इतिहास शिकून घ्या, मुस्लिमांबद्दलच्या विधानावरून दादांचा राणेंना सल्ला.
खोक्याच्या अडचणी वाढणार? आणखी 2 गुन्हे दाखल
खोक्याच्या अडचणी वाढणार? आणखी 2 गुन्हे दाखल.
'माझी गॅरंटी घेऊ नका, कारण...'; जयंत पाटलांचा कोणाला मिश्कील टोला?
'माझी गॅरंटी घेऊ नका, कारण...'; जयंत पाटलांचा कोणाला मिश्कील टोला?.
...म्हणून पंकजा मुंडे मस्साजोगला आजपर्यंत गेल्या नाहीत, कारण आलं समोर
...म्हणून पंकजा मुंडे मस्साजोगला आजपर्यंत गेल्या नाहीत, कारण आलं समोर.