काळजाचा ढोल, श्वासाच्या झांजा; नाशकात फेटेधारी दगडू शेट यांच्या मूर्तीला तुफान मागणी

गणरायाच्या (Nashik Ganpati Festival) आगमनाचे वेध साऱ्यांनाच लागले आहेत. अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव आला असून, नाशकात फेटेधारी दगडूशेटांच्या मूर्तीला तुफान मागणी आहे. विशेषतः शाडूच्या मूर्तीसाठी (Shadu Murti) भाविकांनी आधीपासून बुकिंग करून ठेवली आहे.

काळजाचा ढोल, श्वासाच्या झांजा; नाशकात फेटेधारी दगडू शेट यांच्या मूर्तीला तुफान मागणी
नाशिकमध्ये दगडूशेटांची फेटाबांधलेली ही मूर्ती भाविकांना भुरळ घालत आहे.
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 11:19 AM

नाशिकः गणरायाच्या (Nashik Ganpati Festival) आगमनाचे वेध साऱ्यांनाच लागले आहेत. अवघ्या दोन दिवसांवर गणेशोत्सव आला असून, नाशकात फेटेधारी दगडू शेट यांच्या मूर्तीला तुफान मागणी आहे. विशेषतः शाडूच्या मूर्तीसाठी (Shadu Murti) भाविकांनी आधीपासून बुकिंग करून ठेवली आहे. (Excitement of Ganeshotsav in Nashik, demand for shadumati idols, various offers from traders)

गणराय म्हणजे विघ्नहर्ता. बुद्धीची देवता. गणेशोत्सवाच्या आगमनाने शहराच्या वातावरणाचा नूर पालटतो. शहर असो की गाव मरगळ झटकून कात टाकतात. नाशकाकडे आतापर्यंत पाठ फिरवलेल्या पावसाची गेल्या दोन दिवसांपासून शहरात रिपरिप सुरू आहे. शहर ओलेचिंब होऊन उत्साहाने निथळत आहे. त्या पार्श्वभूमीवर गणरायाचे आगमन सुखकारक ठरणार आहे. सध्या बाजारात पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व ध्यानात घेता भाविकांचा बाप्पांच्या शाडू मातीच्या मूर्ती खरेदी करण्यावर भर आहे. 250 रुपयांपासून या मूर्तीच्या किमती सुरू आहेत. लालबागचा राजा, सिद्धिविनायक, परळचा राजा, दगडू शेट अशा नाना रूपातल्या मूर्ती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शहरातील अशोकस्तंभ, मध्यवर्ती बसस्थानक, कॅनडा कॉर्नर, गंगापूररोड, कॉलेजरोड, नाशिकरोड, अशोकामार्ग, द्वारका, पंचवटी, मुंबई नाका, इंदिरानगर, लेखानगर, महात्मानगर, तपोवन आदी भागांत बाप्पांच्या मूर्तीची दुकाने थाटलेली आहेत. सध्या फेटाबांधलेल्या दगडू शेट यांच्या मनमोहक मूर्तीची भाविकांकडून मागणी आहे. या मूर्तीसाठी अक्षरशः वेटिंग लागलेली असून, अनेकांनी पंधरा दिवसांपूर्वी बुकिंग करून ठेवल्याची माहिती आंधोळकरबंधू गणपतीवाले यांनी दिली.

गणेशोत्सवात ऑफरचा धमाका

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हे सण व्यापाऱ्यांसाठी सुगीचे दिवस असतात. या काळात मोठी उलाढाल होते. मोठमोठे मॉल, बड्या कंपन्या विविध खरेदीवर ऑफर ठेवतात. नाशकात सध्या छोट्याछोट्या किराणा दुकानदारांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफरचा बार उडवून दिला आहे. त्यात 3000 हजारांची खरेदी केल्यास त्यावर 250 रुपयांचा थर्मास फक्त 100 रुपयांत मिळत आहे. 4500 रुपयांच्या खरेदीवर हॉटपॉट किंवा अप्पे पात्र 209 रुपयांत, 9000 रुपयांची खरेदी केल्यास त्यावर फ्रायपॅन किंवा डोसापॅन 419 रुपयांत मिळत आहे.

पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व लक्षात घेता आम्ही शाडू गणपतीच्या मूर्तींचा स्टॉल थाटला आहे. आमच्याकडे अगदी 250 रुपयांपासून मूर्ती उपलब्ध आहेत. भाविकांना फेटा बांधलेल्या दगडू शेट यांच्या मूर्तीने भुरळ पाडली आहे. या मूर्तीसाठी अनेकांनी पंधरा दिवसांपूर्वी बुकिंग करून ठेवली आहे. – नितीन आंधोळकर, आंधोळकर बंधू मूर्तीवाले

गणेशोत्सवापासून व्यापारी वर्गाची सुगी सुरू होते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना आणि टाळेबंदीमुळे म्हणावी तशी मोठी उलाढाल झाली नाही. या वर्षी तरी मोठी खरेदी होईल अशी आशा आहे. त्यासाठी किराणापासून ते सर्व व्यापाऱ्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या ऑफर ठेवल्या आहेत. – पी. टी. पाटील, किराणा व्यापारी (Excitement of Ganeshotsav in Nashik, demand for shadumati idols, various offers from traders)

इतर बातम्याः

नाशिकमध्ये बेमुदत बंदची हाक

बार सुरू होतात तर मग मंदिरांना प्रोटोकॉल नाहीत का? मंदिर उघडण्याबाबत राज्यानं स्वत: निर्णय घ्यावा : भारती पवार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.