कोबीला मातीमोल भाव; 2 एकरातील भाजीवर रोटर फिरवला…

गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आता टोकाचे पाऊल उचलले आहे. कवडीमोल भावाने शेतीमाल घेतला जात असल्याने पीक भूईसपाट करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.

कोबीला मातीमोल भाव; 2 एकरातील भाजीवर रोटर फिरवला...
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 2:43 PM

येवला/नाशिक : राज्यातील सरकार कोणतंही असो, सत्तांतर होऊन सरकार बदलले गेले तरी शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये मात्र कोणताही बदल झाल्याचे दिसून येत आहे. शेतीच्या प्रत्येक हंगामात कोणत्या ना कोणत्या समस्यांचा डोंगर मात्र हटता हटेना अशी अवस्था शेतकऱ्यांच्या झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. शेतकऱ्यांनी पिकासाठी केलेला खर्चही शेतीमालातून निघणं कठीण झाले आहे. शेतीमाल एक क्विंटल घालूनही शेतकऱ्यांच्या हातात शंभर रुपये मिळणे कठीण झाले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी आता शेतातील पीक काढण्यापेक्षा आणि खर्च करण्यापेक्षा ते मातीतच घातलेले बरे म्हणून आता त्यांनी शेतीमालावरच नांगर फिरवण्याचे धाडस केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कांदा, वांगे, आणि इतर भाजीपाल्याच्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांनी शेतात आलेल्या पिकावर कधी ट्रॅक्टर फिरवतात,

कधी उभा पिकात जनावरं सोडतात तर विजय जेजुरकर यांच्यासारख्या शेतकऱ्याकडून आलेल्या कोबीच्या पिकावर रोटर फिरवून हे पीक आता मातीमोल करुन टाकण्यात आले आहे.

त्यांनी या पिकावर रोटर फिरवला असला तरी त्यासाठी केलेली मेहनत, त्याच्यासाठी वापरण्यात आलेली खते, औषध फवारणीचा साधा खर्चही या पिकातून निघणार नसल्यामुळेच विजय जेजुरकर यांनी हा निर्णय घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी कांद्याच्या पिकावरही ट्रॅक्टर फिरवून कांदा मातीत घातला होता. तर काल पुणे जिल्ह्यातील पुरंदर जिल्ह्यातील एका गावामध्ये वांगे पिकावर ट्रॅक्टर फिरवण्यात आला होता.

त्यानंतर आता कांद्यापाठोपाठ कोबी पिकावर रोटर फिरवत जोमदार कोबीचे पीक भुईसपाट करण्यात आले आहे. येवला तालुक्यातील धामणगाव येथील शेतकरी विजय जेजुरकर यांनी कोबी पिकावर रोटर फिरवून त्यांनी आपले पीक भुईसपाट करण्यात आले आहे.

विजय जेजुरकर यांनी पन्नास हजार रुपये खर्च करून दोन एकरमध्ये कोबीचे पीक घेतले होते. मात्र दीड ते दोन किलो वजनाच्या कोबीच्या गट्ट्याला दोन रुपये इतका मिळत आहे त्यामुळेच जेजुरकर यांनी पिकावर रोटर फिरवण्याचा निर्णय घेतला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.