विघ्नहर्त्या बाप्पांची या मुहूर्तावर करा प्राणप्रतिष्ठा!

कोरोनानं पिचून काढलेल्या, नाना व्यथांनी पीडलेल्या आणि उदास झालेल्या वातावरणाला बाप्पांच्या उत्सवाने आशेची पालवी फुटली आहे. नाशिकमध्ये (Nashik) शुक्रवारी घरोघरी बाप्पांचे (Ganesh Festival) आगमन होईल. तुम्हीही घरात बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करणार असाल, तर ती दुपारी दीडच्या आत करा, असे दाते पंचांगात (Date Panchang) सांगण्यात आले आहे.

विघ्नहर्त्या बाप्पांची या मुहूर्तावर करा प्राणप्रतिष्ठा!
गणपती बाप्पा
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 6:07 PM

नाशिकः कोरोनानं पिचून काढलेल्या, नाना व्यथांनी पीडलेल्या आणि उदास झालेल्या वातावरणाला बाप्पांच्या उत्सवाने आशेची पालवी फुटली आहे. नाशिकमध्ये (Nashik) शुक्रवारी घरोघरी बाप्पांचे (Ganesh Festival) आगमन होईल. तुम्हीही घरात बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करणार असाल, तर ती दुपारी दीडच्या आत करा, असे दाते पंचांगात (Date Panchang)सांगण्यात आले आहे. (Ganesh Pujan and praanpratitha till 1:30 pm)

सोलापूरच्या दाते पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाते. पार्थिव गणेशाची याच दिवशी प्राणप्रतिष्ठा करतात. त्यासाठी गणरायाच्या आगमनाच्या एक-दोन दिवस किंवा पंधरा दिवस आधीही घरात मूर्ती आणून ठेवता येते. या वर्षी गणेश चतुर्थीला पहाटे ४.५० पासून घरगुती बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त सुरू होतो. दुपारी दीडपर्यंत भाविकांना आपल्या घरात गणरायांची स्थापना करता येईल.

…तरीही करा बाप्पांचे विसर्जन

अनेकजण घरामध्ये गर्भवती स्त्री असल्यास बाप्पांचे विसर्जन करत नाहीत. मात्र, हे चुकीचे आहे. प्राणप्रतिष्ठा करून बसविलेली मूर्ती उत्तरपूजा करून खाली घ्यावी. तिचे पाण्यात विसर्जन करावे. विशेषतः वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याऐवजी घरी एखाद्या भांड्यात किंवा टँकमध्ये विसर्जन केल्यास उत्तम. त्यामुळे प्रदूषणालाही आळा बसेल.

12 सप्टेंबरला गौरी आवाहन

शहरात 12 सप्टेंबर रोजी गौरी आवाहन आहे. सकाळी ९.५० नंतर गौरी आवाहन करता येईल. 13 सप्टेंबर रोजी गौरीपूजन, आणि 14 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून पाच मिनिटांनंतर गौरी विसर्जन करता येणार आहे. दरम्यान, 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून या दिवशी बाप्पांचे विसर्जन होईल. पुढल्या वर्षी 31 ऑगस्ट 2022 रोजी बाप्पांचे आगमन होईल.

चांदीच्या गणेश मूर्ती

सध्या सराफा बाजारात चांदीच्या गणेश मूर्ती आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. गणेशोत्सव सुरू असल्याने अनेक भाविक चांदीच्या गणेश मूर्तीची खरेदी करायला प्राधान्य देत आहेत. ही गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा करून कायमस्वरूपी घरात ठेवली जाते. नाशिक चांदीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे. चांदीची वेगवेगळ्या प्रकारचे दागिने ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

व्यापाऱ्यांत उत्साह

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हे सण व्यापाऱ्यांसाठी सुगीचे दिवस असतात. या काळात मोठी उलाढाल होते. मोठमोठे मॉल, बड्या कंपन्या विविध खरेदीवर ऑफर ठेवतात. नाशकात सध्या छोट्याछोट्या किराणा दुकानदारांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफरचा बार उडवून दिला आहे. त्यात 3000 हजारांची खरेदी केल्यास त्यावर 250 रुपयांचा थर्मास फक्त 100 रुपयांत मिळत आहे. 4500 रुपयांच्या खरेदीवर हॉटपॉट किंवा अप्पे पात्र 209 रुपयांत, 9000 रुपयांची खरेदी केल्यास त्यावर फ्रायपॅन किंवा डोसापॅन 419 रुपयांत मिळत आहे. (Ganesh Pujan and praanpratitha till 1:30 pm)

संबंधित बातम्याः

नाशिकमध्ये सोने 47200 वर, चांदीच्या गणेश मूर्तीला मागणी

मिठाईत भेसळ केल्यास दहा लाखांचा दंड, पाच वर्षांचा कारावास

…तर अंधारात बाप्पांची प्राणप्रतिष्ठा, नाशिकमधली मंडळे आक्रमक, पालिकेला इशारा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.