Gehlot on Nashik Crime | निवडणुकीच्या तोंडावर माझ्याविरोधात कुंभाड; राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोतांच्या मुलाचे स्पष्टीकरण
नाशिकच्या व्यावसायिकाला अव्वाच्या सव्वा नफ्याचे आमिष दाखवून गुजरातमधील संशयितांनी हा गंडा घातला आहे. या प्रकरणी गंगापूर रोड भागातील सुशील पाटील यांच्या तक्रारीवरून गंगापूर रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये वैभव गेहलोत नावाच्या राजस्थान येथील संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे हे गेहलोत नेमके कोण, असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे.
नाशिकः येणाऱ्या वर्षात राजस्थान विधानसभेची निवडणूक आहे, त्या तोंडावर आपल्यावर निराधार आरोप केले जात आहे, असे स्पष्टीकरण राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत यांनी दिले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नाशिकमध्ये एका व्यावसायिकाची सात कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये वैभव गेहलोत असे एका संशयिताचे नाव आहे. याप्रकरणावरून गेहलोत यांनी हे स्पष्टीकरण दिल्याचे समजते. नाशिकच्या (Nashik) व्यावसायिकाला अव्वाच्या सव्वा नफ्याचे आमिष दाखवून गुजरातमधील संशयितांनी हा गंडा घातला आहे. या प्रकरणी गंगापूर रोड भागातील सुशील पाटील यांच्या तक्रारीवरून गंगापूर रोड पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. यामध्ये वैभव गेहलोत नावाच्या राजस्थान येथील संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे हे गेहलोत नेमके कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कशी केली फसवणूक?
फसवणूक प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, सुशील भालचंद्र पाटील यांची गुजरातच्या जोधपूर येथील संशयितांशी ओळख झाली. सचिनभाई पुरुषोत्तमभाई वेलेरा, वैभव गहलोत, किशन कोन्तेलिया, सरदारसिंह चौहान, प्रवीणसिंह चौहान, सुहास सुरेंद्रभाई मकवाल, निरवभाई, महेशभाई, प्रग्येशकुमार विनोदचंद्र प्रकाश, संजयकुमार देसाई, सावनुकमार पारनेर, रिशिता शाह अशा 15 जणांनी पाटील यांना मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले आणि गुंतवणूक करायला भाग पाडली.
पोलिसही पडले संभ्रमात
आपल्याला राजस्थान सरकारमधील ई-टॉयलेट व पर्यटन विभागाच्या जाहिरातीसाठी संपूर्ण राज्याचे ई-टेंडर काम मिळाले आहे. यात गुंतवणूक केल्यास प्रचंड नफा होईल, असे आमिष सुशील पाटील यांना दाखवले. या नफ्याच्या लाभापोटीच पाटील फसले आणि त्यांना गंडा घालण्यात आला. दरम्यान, गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये वैभव गेहलोतसह राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांचे नाव असल्याचे समजते. मात्र, वैभव गेहलोत हा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा आहे की, दुसरा आणखी कोणी, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
Rajasthan Assembly polls scheduled to be held in the year 2023. So, these kinds of baseless allegations will be levelled at me.We’ll continue to work for the public: Vaibhav Gehlot,Pres, Rajasthan Cricket Association, on a cheating case against him in Maharashtra’s Nashik (19.03) pic.twitter.com/y5FnNN70aL
— ANI (@ANI) March 20, 2022
गेहलोत म्हणतात की…
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत यांनी हे सारे आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले की, राजस्थान विधानसभेची निवडणूक 2023 मध्ये होणार आहे. त्यामुळे माझ्यावर असे निराधार आरोप केले जात आहेत. आम्ही जनतेसाठी काम करत राहू. सध्या वैभव गेहलोत हे राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.
इतर बातम्याः