राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून बोलायला लागल्याने राऊतांची ओळख, गिरीश महाजन यांची खोचक टीका

शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेल्या फोन टॅपिंगच्या आरोपावर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राऊत यांच्या बोलण्याला काही किंमत नाही.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून बोलायला लागल्याने राऊतांची ओळख, गिरीश महाजन यांची खोचक टीका
राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून बोलायला लागल्याने राऊतांची ओळख, गिरीश महाजन यांची खोचक टीकाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 05, 2022 | 2:46 PM

नाशिक: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्याकडून करण्यात आलेल्या फोन टॅपिंगच्या (phone tapping) आरोपावर भाजपचे नेते गिरीश महाजन (girish mahajan) यांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राऊत यांच्या बोलण्याला काही किंमत नाही. ज्या वेळेस आमची सत्ता होती, तेव्हा संजय राऊत कुठे होते? संजय राऊत यांना याआधी कोणी ओळखत नव्हते. मागच्या काही दिवसांपासून त्यांना लोक ओळखायला लागले. राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून बोलायला लागले, तेव्हा त्यांची ओळख झाली, अशी खोचक टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. शिवसेना आम्हाला सोडून गेली त्यात सर्वात मोठा पुढाकार संजय राऊत यांचा होता. त्यानंतर त्यांना लोक ओळखायला लागले, असा टोलाही महाजन यांनी लगावला. गिरीश महाजन नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधत असताना राऊत यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला.

नाशिकचं प्रभारीपद मिळाल्यानंतर गिरीश महाजन पहिल्यांदा नाशिकमध्ये आले होते. आमच्या काळात फोन टॅप झाले याबाबतचे कोणतेही पुरावे नाहीत. देशभरातील सर्व विरोधकांचे आता राऊत नाव घेतील. ते भंपक विधाने करत आहेत. आरोप करतायत तर पुरावे द्या ना, असं सांगतानाच राऊत यांच्या जीभेला हाड उरले नाही, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली. रश्मी शुक्लाप्रकरणी राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणा काम करत आहेत. या चौकशीत काही पुरावे समोर आले तर त्या गोष्टीला अर्थ आहे, असंही ते म्हणाले.

मनासारखं होत नसल्यानेच राज्यपाल हटाव

सत्ताधाऱ्यांकडून राज्यपाल हटावची मागणी केली जात आहे. त्यावर त्यांनी टीका केली. राज्यपालांची नेमणूक काही शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या हातात नाही. आमच्या मना सारख करा नाहीतर राज्यपालांना हटवा अशी त्यांची भूमिका आहे. शासनाच्या, पोलीस खात्याच्या बदल्यांमध्येही हाच प्रकार सुरू आहे. मनासारखं करा नाही तर हटवा, हे धोरण राबवले जात आहे. पण राज्यपालांचं पद संवैधानिक आहे. कोणी कितीही म्हटलं तरी आम्ही फारसा लक्ष देत नाही, असं ते म्हणाले.

मलिकांचा राजीनामा घ्या

नवाब मलिक यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा ही आमची मागणी आहे. दाऊदच्या हस्तकाकडून नगण्य किमतीत त्यांनी प्रॉपर्टी घेतली आहे. हसीना पारकरला पैसे दिले आहेत. तरीही राज्यसरकार त्यांना देशभक्त म्हणत असेल तर काय बोलणार. मग संजय राठोड यांचा राजीनामा का घेतला? हे गेंड्याच्या कातडीचे सरकार आहे. यांना जनाची मनाची काहीच राहिली नाही. कुठे बाळासाहेबांची शिवसेना आणि आज नवाब मलिक जिंदाबादच्या घोषणा देणारी शिवसेना. यापेक्षा शिवसेनेचे दुर्दैव काही नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

तोपर्यंत निवडणुका नकोच

ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये ही आमची मागणी आहे. पण राज्य सरकार नाकर्ते आहे. या सरकारने कोर्टाला अहवाल पाठवला त्यावर सही, तारीखही नव्हती. मंत्रिमंडळाच्या बैठका घेतात आणि मुख्यमंत्र्यांनी सही पण केली नाही, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

ज्योतिषाचं काम घ्यावं इतकी माझी वाईट अवस्था नाहीये; शरद पवारांचा नेमका टोला कुणाला?

फडणवीस असताना फोन टॅपिंगच्या घटना घडल्या, किंमत अधिकाऱ्यांना चुकवावी लागेल: शरद पवारांचा इशारा

नारायण राणे मालवणी पोलीस स्टेशनला पोहोचले; दिशा सालियन प्रकरणात आपली बाजू मांडणार

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.