नाशिकमध्ये सोने 47600 वर, चांदी 1300 रुपयांनी महाग

गणरायाच्या आगमनादिवशी (Ganesh Fest) शुक्रवारी (10 सप्टेंबर) नाशिकमध्ये (NashikGold) 24 कॅरेट सोन्याचे दहा ग्रॅम मागचे दर 47600 आहेत, अशी माहिती इंडिया बुल अँड ज्वेलर्स असोसिएशनचे महाराष्ट्र डायरेक्टर चेतन राजापूरकर यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना दिली.

नाशिकमध्ये सोने 47600 वर, चांदी 1300 रुपयांनी महाग
सोन्याचे दर स्थिर.
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 4:35 PM

नाशिकः गणरायाच्या आगमनादिवशी (Ganesh Fest) शुक्रवारी (10 सप्टेंबर) नाशिकमध्ये (NashikGold) 24 कॅरेट सोन्याचे दहा ग्रॅम मागचे दर 47600 आहेत, अशी माहिती इंडिया बुल अँड ज्वेलर्स असोसिएशनचे महाराष्ट्र डायरेक्टर चेतन राजापूरकर यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना दिली. मात्र, चांदीच्या दरात किलोमागे 1300 रुपयांची वाढ झाली आहे. (Gold at 47600 in Nashik, Gold cheaper by Rs 790 compared to last month)

गणेशोत्सवाने सराफा बाजारातही उत्साह आणला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने आणलेली मरगळ बाप्पांनी घालवली आहे. नाशिकच्या सराफा बाजारामध्ये शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचे दहा ग्रॅम मागचे दर 47,600 आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 44,800 आहेत. या दरावर अतिरिक्त जीएसटी असेल. सराफ्यात चांदीच्या दागिन्यांनाही मागणी वाढली आहे. नाशकात शुक्रवारी चांदीचे दर किलोमागे 66,500 रुपये असून, गुरुवारी चांदीचे किलोमागचे दर 65,800 होते. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी चांदीच्या दरात तेराशे रुपयांची वाढ झाली आहे. यावर अतिरिक्त जीएसटी असेल. दरम्यान, नाशकात गेल्या महिन्यात 1 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅमचे दर हे 48,390 होते. तर 22 कॅरेट सोन्याचे दर हे 47,390 होते. या तुलनेत सप्टेंबरमध्ये या भावात घसरण झाल्याचे पाहायला मिळते.

आता लागेल ओळखपत्र

काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची आता देशभरातील सराफा व्यापाऱ्यांकडून अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे आता सोने, चांदी, हिरे, प्लॅटिनम आणि मौल्यवान रत्नांची खरेदी रोख पैसे देऊन करायची असल्यास तुम्हाला आधारकार्ड आणि पॅनकार्ड दाखवणे बंधनकारक राहील. अन्यथा देशातील कोणत्याही ज्वेलर्समध्ये तुम्हाला सोने खरेदी करता येणार नाही.

काही सराफा बंद

नाशकातील सराफात शुक्रवारी काही दुकाने बंद होती. गणरायाची आज स्थापना असल्यामुळे काही व्यापाऱ्यांनी दुकान बंद ठेवून आपला सारा दिवस घरी बाप्पांच्या आराधनेत घालवला. त्यामुळे अनेक ग्राहकांनी गुरुवारीच आपल्या मनपसंद दुकानातून सोन्याची खरेदी केली.

बाप्पांची आज प्राणप्रतिष्ठा आहे. त्यामुळे अनेक सराफा बंद आहे. सोने आणि चांदीचे भाव ऑगस्ट महिन्यापेक्षा निश्चितच कमी झाले आहेत. आज 24 कॅरेट सोन्याचे दहा ग्रॅम मागचे दर 47,600 आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 44,800 आहेत. – चेतन राजापूरकर, महाराष्ट्र डायरेक्टर, इंडिया बुल अँड ज्वेलर्स असोसिएशन (Gold at 47600 in Nashik, Gold cheaper by Rs 790 compared to last month)

इतर बातम्याः

ताशाचा आवाज तरारा झाला रं, गणपती माझा नाचत आला!

नाशिकमध्ये महापालिका सुरू करणार सीबीएसई शाळा

नाशिकमध्ये विभागीय आयुक्तांच्या बनावट सहीचा वापर करत घातला २१ लाखांचा गंडा

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.