मालेगाव : नाशिकच्या (Nashik) मालेगाव आणि बागलाण तालुक्यात सायंकाळी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले. या मुसळधार पावसानंतर ग्रामीण भागाचे जनजीवन विस्कळित झाल्याचे चित्र आहे. अचानक हजेरी लागलेल्या पावसाने (Rain) परिसरातील शेतीपिके पाण्याखाली गेल्याने शेतजमीन देखील वाहून गेल्या आहेत. तसेच या पावसाने अनेक शेतकरी शेतामध्येच अडकून पडले होते. इतकेच नाही तर या ढगफुटी सदृश्य पावसाने अनेक ठिकाणचे रस्ते फुटले आहेत. अगोदरच बागलाण आणि मालेगाव (Malegaon) तालुक्यात रस्त्यांची समस्या असताना या पावसामुळे रस्त्याची चाळण झालीयं.
काल सायंकाळी नाशिकच्या बागलाण आणि मालेगाव तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावलीयं. अनेक ठिकाणचे रस्ते फुटले तर गाळणे येथील बैलजोडी वाहून गेल्याची घटना घडली घडलीयं. ग्रामस्थांनी पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या बैलजोडीचा रात्री उशीरापर्यंत शोध घेतला. बागलाण तालुक्यातील शिरपूरवडेसह परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने मोसम नदीला हंगामातील दुसरा पूर आला आहे. मोसम नदीच्या पाणीपातळीच मोठी वाढ झालीयं.
शहरातील सांडवा पूल पाण्याखाली गेला असून किल्ला झोपडपट्टीत पाणी शिरले आहे. तहसीलदार सी. आर राजपूत आणि आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी या परिसराची पाहणी केलीयं. खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत बागलाणमधील श्रीपुरवडे शिवारात ढगफुटी सदृश पर्जन्यवृष्टी झाली असल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सर्तकतेचा इशाराही देण्यात आलायं.