वायरिंग लोंबकळलेली, लाईटच्या ट्यूब कोणत्याही क्षणी खाली पडण्याची शक्यता, इगतपुरीचं ग्रामीण रुग्णालय ‘व्हेंटिलेटरवर’, रुग्णांचा जीव मुठीत

इगतपुरी रुग्णालयामध्ये सद्य:स्थितीतही चांगले उपचार होत असले, तरी भिंतीवरुन ओंघळणारे पावसाचे पाणी, लोंबकळणारे स्विच अन् तुटलेल्या वायरिंगमुळे रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वायरिंग लोंबकळलेली, लाईटच्या ट्यूब कोणत्याही क्षणी खाली पडण्याची शक्यता, इगतपुरीचं ग्रामीण रुग्णालय 'व्हेंटिलेटरवर', रुग्णांचा जीव मुठीत
इगतपुरीतील ग्रामीण रुग्णालयाची झालेली दुर्दशा
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 1:01 PM

नाशिक : सर्वसामान्यांना परवडेल असे उपचार होण्यासाठी इगतपुरी येथे ग्रामीण रुग्णालय सुरु करण्यात आले. सुरुवातीस मिळणाऱ्या चांगल्या सुविधांमुळे येथील रुग्णांवर उत्तम उपचार केले जात होते. सद्य:स्थितीतही उपचार चांगले होत असले, तरी भिंतीवरुन ओंघळणारे पावसाचे पाणी, लोंबकळणारे स्विच अन् वायरिंगमुळे रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

इगतपुरीचं ग्रामीण रुग्णालय व्हेंटिलेटरवर

एकीकडे कोरोनाच्या तिसरी लाट थोपवण्यासाठी युद्धपातळीवर काम करत असताना व तिसऱ्या लाटेचा धोका बालकांना होणार असल्याचे सांगितले जात असताना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात बालगृहातील स्लॅबच्या छताला पडलेला ढपल्यामुळे रुग्णांमधील भीती अधिक गडद झाली आहे. बाल गृहाबरोबरच ऑपरेशन थिएटर, प्रसूती गृह, जनरल वार्ड, औषध गृहाचीही हीच परिस्तिथी आहे.

रुग्णालयाची अवस्था पाहून रुग्ण भीतीच्या छायेखाली

प्रसूतीगृह, बालरोग, ऑर्थोपेडिक, सर्व प्रकारच्या जनरल शस्त्रक्रियांसह येथे उपचार केले जातात. सर्व उपचार नाममात्र शुल्कांमध्ये होत असल्याने येथे रुग्णांची नेहमीच वर्दळ असते. दैनंदिन ओपीडीद्वारे 150 ते 200 रुग्णांवर उपचार केले जातात. तर 70 ते 80 निवासी रुग्णांवर उपचार केले जातात. यामध्ये प्रामुख्याने गोरगरीबांची संख्या लक्षणीय असते.

खासगी हॉस्पिलमध्ये उपचारांसाठी लागणारा भरमसाठ खर्च अधिक असल्याने शहरातील अनेक कनिष्ठ मध्यमवर्गीय ग्रामीण रुग्णालयाचा आधार घेतात. पण येथील परिस्थितीवरून येथे येणारे सर्व रुग्ण भीतीच्या छायेखाली वावरत असल्याचे चित्र आहे.

वायरिंग लोंबकळलेली, लाईटच्या ट्यूब कोणत्याही क्षणी खाली पडण्याची शक्यता

रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या अनेक भिंतींवर वायरिंग लोंबकळत असून लाईटच्या ट्यूब कोणत्याही क्षणी खाली पडण्याची शक्यता आहे. पावसाचे पाणी भिंतीवरुन खाली पडत असल्याने रुग्णालयाच्या आवारात अनेक ठिकाणी पाणी साचते . तर बालगृहातील स्लॅबच्या छताचा ढपला पडल्यामुळे रुग्णामध्ये अधिकच भिती निर्माण झाली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर

सुदैवाने काही दिवसांपूर्वी स्लॅबच्या छताचा ढपला पडताना बालगृह विभागात रुग्ण नसल्याने अनर्थ टळला असला तरी यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला सुविधांसाठी रुग्णालयाच्यावतीने अनेकदा पत्रव्यवहार केला गेला आहे. प्रस्तावही पास झाला, टेंडरही निघाले पण सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त आहे. दरम्यान, बांधकाम विभागाचे अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

(Hospital in Nashik Igatpuri is in bad condition Fear in patients undergoing treatment)

हे ही वाचा :

साहेब, तुमच्या सोईनुसार 2 तारखेला या, नाशिक पोलिसांची नारायण राणेंना विनंती

देवेंद्र फडणवीस म्हणाले, नाशिक पोलीस आयुक्त छत्रपती आहेत का? आता पोलीस आयुक्तांकडून उत्तर

‘तांदुळ शिजण्याऐवजी थेट वितळले’, नाशिकमध्ये पोषण आहारात प्लास्टिक तांदुळ असल्याचा आरोप

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.