नऊ दिवसांच्या बाळासह बैठकीला हजर, नाशकातील महिला सरपंचाच्या कार्यतत्परतेचं कौतुक
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या मायदरा-धानोशी ग्रामपंचायतच्या सरपंच पुष्पा साहेबराव बांबळे यांनी आपल्या नऊ दिवसांच्या लहान बाळासह ग्रामपंचायत मासिक मिटींगला उपस्थिती दर्शवली (Igatpuri woman sarpanch attends monthly meeting with nine-day old baby).
नाशिक : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या मायदरा-धानोशी ग्रामपंचायतच्या सरपंच पुष्पा साहेबराव बांबळे यांनी आपल्या नऊ दिवसांच्या लहान बाळासह ग्रामपंचायत मासिक मिटींगला उपस्थिती दर्शवली (Igatpuri woman sarpanch attends monthly meeting with nine-day old baby).
मायदरा-धानोशी ग्रामपंचायतच्या सरपंच पुष्पा साहेबराव बांबळे यांनी नऊ दिवसांपूर्वीच एका मुलीला जन्म दिला. बाळंत असूनही मंगळवारी (29 जून) दरम्यान ग्रामपंचायतच्या मासिक मीटिंग अजेंडा देऊन आयोजित करण्यात आलेली होती. या मासिक मिटींगला सरपंच पुष्पा बांबळे यांनी आपल्या नऊ दिवसांच्या गोंडस मुलीसह उपस्थिती लावली. हे पाहून तेथील सर्वच आवाक झाले होते.
या मासिक मीटिंगमध्ये सरपंच बांबळे यांनी गाव विकासाच्या दृष्टीने गावातील पाणी पुरवठा, लाईट प्रश्न, दलित वस्तीतील मंजूर पथदीप विकास कामे, घरकुल योजने संदर्भात सविस्तर माहिती, गावातील शिवार रस्ते या प्रश्नासंदर्भात आढावा घेतला.
दरम्यान, नऊ दिवसांच्या बाळासह सरपंच पुष्पा बांबळे या ग्रामपंचायत मासिक मिटींगला उपस्थित राहिल्या आणि त्यांनी गाव विकासाची कामे मीटिंगमध्ये मांडली. या त्यांच्या कार्यामुळे ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक नितीन हेंबाडे, ग्रामपंचायत उपसरपंच चंद्रभागा बहिरु केवारे, ग्रामपंचायत सदस्य लंकाबाई बांबळे, गंगाराम करवंदे आदींसह ग्रामस्थांनी सरपंच पुष्पा बांबळे यांचे स्वागत करून अभिनंदन आभार व्यक्त केले.
दरम्यान, “एक लोकप्रतिनिधी या नात्याने गावातील ग्रामस्थांच्या समस्या सोडविणे त्यांचे विविध प्रश्न शासन स्तरावर मांडणे हे माझं कर्तव्य समजते”, असे यावेळी सरपंच पुष्पा बांबळे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी यावेळी मीटिंग दरम्यान सरपंच पुष्पा साहेबराव बांबळे, उपसरपंच चंद्रभागा बहिर केवारे, लंकाबाई विठ्ठल बांबळे, गंगाराम करवंदे, साहेबराव बांबळे, बहिरु केवारे, ग्रामविकास अधिकारी नितीन हेंबाडे, ग्रामपंचायत कर्मचारी गोरख धोंगडे, रंगनाथ लोहकरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
शेतकरी, त्याचं कुटुंब शेतात राबल्यानं कोरोना संकटात अन्न धान्य पुरलं, दादा भुसेंचं वक्तव्य, पुरेशा पावसानंतर पेरणीचं आवाहनhttps://t.co/LSWOWBHqDI#Farmer | #DadaBhuse | #Maharasthra | @dadajibhuse | @ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 25, 2021
Igatpuri woman sarpanch attends monthly meeting with nine-day old baby
संबंधित बातम्या :
नाशिकमध्ये निर्बंधांमध्ये बदल नाही, कडक संचारबंदीच्या पालनासाठी पोलिसांनी कठोर कारवाई : छगन भुजबळ