नाशिकः प्रदूषण मुक्ततेची दीक्षा देऊन बाप्पा गेले गावाला; रुखरुख लागे जीवाला!

नाशिकसह ( Nashik) उत्तर महाराष्ट्रात रविवारी (19 सप्टेंबर) मोठ्या उत्साहात बाप्पांचे (Ganpati Bappa) विसर्जन करण्यात आले. सार्वजनिक मिरवणुकीवर बंदी असल्याने यावर्षीही भाविकांचे मनमोहक नृत्य पाहायला मिळाले नाही. विशेष म्हणजे यंदा भाविकांनी बाप्पांच्या विसर्जनासाठी (artificial immersion) कृत्रिम स्थळांना पसंदी दिली. त्यामुळे प्रदूषण मुक्ततेची दीक्षा देऊन बाप्पा गेले गावाला, अशीच परिस्थिती होती.

नाशिकः प्रदूषण मुक्ततेची दीक्षा देऊन बाप्पा गेले गावाला; रुखरुख लागे जीवाला!
नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 10:44 AM

नाशिकः नाशिकसह ( Nashik) उत्तर महाराष्ट्रात रविवारी (19 सप्टेंबर) मोठ्या उत्साहात बाप्पांचे (Ganpati Bappa) विसर्जन करण्यात आले. सार्वजनिक मिरवणुकीवर बंदी असल्याने यावर्षीही भाविकांचे मनमोहक नृत्य पाहायला मिळाले नाही. विशेष म्हणजे यंदा भाविकांनी बाप्पांच्या विसर्जनासाठी (artificial immersion) कृत्रिम स्थळांना पसंदी दिली. त्यामुळे जलप्रदूषण कमी झाले अन् प्रदूषण मुक्ततेची दीक्षा देऊन बाप्पा गेले गावाला, अशीच परिस्थिती होती. (Immersion of Ganpati Bappa in Nashik, devotees prefer artificial immersion places)

गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणरंगाने नाशिकरांच्या रोजच्या जगण्यात उत्साह आणला होता. रोज सकाळी आणि रात्री बाप्पांची आरती, मोदकांची आरास, ओळीव लाडू असा गणरायाला आवडणारा नैवेद्य सुरू होता. अनेक मंडळांनी देखावे केले होते. पंचवटी, रामकुंड, शालीमार, काठेवाडी, महात्मानगर, गंगापूररोड, नाशिकरोड, मुंबईनाका, अशोकामार्ग, तिडके कॉलनी, इंदिरानगर, दीपालीनगरसह शहरभर बाप्पांची आराधना सुरू होती. गणपती विसर्जन करण्यासाठी महापालिका प्रशासनाने 28 नैसर्गिक, तर 43 कृत्रिम स्थळांची सोय केली आहे. नदीतले प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली होती. प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम स्थळांमध्ये बाप्पांचे विसर्जन करा असे आवाहन महापालिकेने केले होते. भाविकांनी या आवाहनाला जोरदार प्रतिसाद दिला.

कृत्रिम विसर्जन स्थळांना पसंदी

पंचवटी येथे राजमाता मंगल कार्यालय, गोरक्ष नगर, आरटीओ कॉर्नर, नांदूर मानूर, कोणार्क नगर, तपोवन, प्रसाद महाराज गार्डन सरस्वती नगर, रामवाडी जॉगिंग ट्रॅक या कृत्रिम विसर्जन स्थळावर बाप्पांना निरोप देण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. नाशिक पूर्वमधील लक्ष्मी नारायण घाट, रामदास स्वामी मठाजवळ, टाकळी, रामदास स्वामी नगर, बस थांबा, नंदिनी-गोदावरी संगम, साईनाथ नगर चौफुली, डीजीपी नगर, गणपती मंदिराजवळ, शारदा शाळेसमोर, राणे नगर, कला नगर चौक, राजसारथी या कृत्रिम स्थळांवर बाप्पांच्या विसर्जनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शहरातील इतर भागांमध्येही कृत्रिम विसर्जन स्थळांवर बाप्पांच्या विसर्जनासाठी गर्दी पाहायला झालेली मिळाली. त्यामुळे भाविकांनी प्रदूषणमुक्ततेकडे एक पाऊल टाकल्याचे पाहायला मिळाले.

जळगाव, धुळे नंदुरबारनेही कित्ता गिरवला

जळगाव, धुळे, नंदुरबारमध्येही भाविकांनी बाप्पांचे कृत्रिम विसर्जन स्थळांवर विसर्जन करायला पसंदी दिली. विशेषतः अनेक भाविकांनी घरीच शाडूचे गणपती तयार केले होते. त्यामुळे त्यांनी घरातच बादलीभर पाण्यामध्ये बाप्पांचे विसर्जन करून प्रदूषण मुक्ततेचा पायंडा पाडला. याचे अनुकरण इतर ठिकाणीही झाले तर, नक्कीच नद्या, विहिरी आणि एकंदरच जलप्रदूषणात घट होईल.

इतर बातम्याः

निफाडमध्ये तुरटीच्या गणपतीचं विसर्जन, येवल्यात साध्या पद्धतीने बाप्पाला निरोप, मनमाडमध्ये कडक निर्बंधामुळे भक्तांचा हिरमोड

नगरच्या कोरोनाचे नाशिकवर विघ्न, चाचण्या वाढवण्याचे आदेश; सिन्नरमध्ये पुन्हा 296 रुग्ण

सोने-चांदी स्वस्त, खरा खरेदी मस्त; जाणून घ्या नाशिक सराफातील भाव!

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.