नाशिकमध्ये 3 लाख 96 हजार 759 रुग्ण कोरोनामुक्त, 928 जणांवर उपचार सुरू

नाशिक (Nashik) जिल्ह्यात 3 लाख 96 हजार 759 रुग्ण कोरोनामुक्त (Corona Patient) झाले असून, सध्या 928 जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 8 हजार 600 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी (Nashik helth) डॉ. अनंत पवार यांनी गुरुवारी दिली.

नाशिकमध्ये 3 लाख 96 हजार 759 रुग्ण कोरोनामुक्त, 928 जणांवर उपचार सुरू
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 4:23 PM

नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यात 3 लाख 96 हजार 759 रुग्ण कोरोनामुक्त (Corona Patient) झाले असून, सध्या 928 जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 8 हजार 600 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी (Nashik helth) डॉ. अनंत पवार यांनी गुरुवारी दिली. (In Nashik, 3 lakh 96 thousand 759 patients are corona free, 928 people are undergoing treatment)

सध्या जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 97 टक्के आहे, शहरात 98 टक्के, मालेगावमध्ये 96.79 टक्के आहे. जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.69 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण हे 97.65 टक्के असल्याचे कळविण्यात आले आहे. आजपर्यंत नाशिक ग्रामीणमध्ये 4 हजार 143 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक महापालिका क्षेत्रात 3 हजार 974, तर मालेगाव महापालिका क्षेत्रातून 357 आणि जिल्ह्याबाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 600 रुग्णांचा आजपर्यंत मृत्यू झाल्याचे कळविण्यात आले आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटेच्या दरम्यान नाशिक आणि मालेगाव ही शहरे साथीचे हॉटस्पॉट ठरले होते. येथे कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्याही झपाट्याने वाढली होती. हे सारे पाहता आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेत नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. शहरात उद्यापासून गणेशोत्सव सुरू आहे. त्यानंतर नवरात्रोत्सव आहे. या दोन्ही सणांच्या दरम्यान नागरिकांनी एकाच ठिकाणी गर्दी करू नये. सुरक्षित अंतराचे पालन करावे. प्रत्येकाने घराबाहेर पडताच मास्क घालावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले असून, सर्वांना तातडीने लस टोचून घेण्यात यावी, असेही सांगण्यात आले आहे.

नाशिक, मालेगाव हॉटस्पॉट

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत नाशिक आणि मालेगाव हॉटस्पॉट ठरले होते. या दोन्ही लाटेत येथील रुग्णवाढीचे प्रमाणही जास्त होते. त्यामुळे साऱ्या राज्याचे लक्ष नाशिककडे लागले होते. त्यानंतर औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, पुणे, मुंबई या शहरातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. मात्र, गेल्या काही दिवसांत नाशिकमधील रुग्णांचे प्रमाण आटोक्यात आले आहे.

नियमांचा फज्जा

नाशिकमध्ये सध्या रोज कमी कोरोना रुग्ण निघत असले तरी अजूनही तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, त्या पार्श्वभूमीवर नागरिक बिनधास्त फिरताना दिसत आहेत. शहरातील पंचवटी, द्वारका, मुंबईनाका, कॉलेजरोड, गंगापूररोड, अशोकामार्ग, मुख्य बसस्थानक परिसर या भागातही बहुतांश जण नियमांचे पालन करत नाहीत. मास्क हल्ली क्वचितजणच वापरतात. अनेक ठिकाणी गर्दी होते. शहरात विविध आंदोलनेही सुरू असतात. हे पाहता तिसरी लाट आल्यास तिला आवरणे नक्कीच कठीण होणार आहे. (In Nashik, 3 lakh 96 thousand 759 patients are corona free, 928 people are undergoing treatment)

इतर बातम्याः

नाशिकच्या उद्योगांचे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले वीजदर अनुदान अखेर सुरू

…तर अंधारात बाप्पांची प्राणप्रतिष्ठा, नाशकातली मंडळे आक्रमक, पालिकेला इशारा

नाशकात धरणे तुडूंब, सात प्रकल्पातून विसर्ग सुरू

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.