लॉटरी लागली लॉटरी…सोने 900 रुपयांनी स्वस्त…जाणून घ्या नाशिकमधील भाव
नाशिकच्या (Nashik) सराफा बाजार पेठेमध्ये मंगळवारी (21 सप्टेंबर) 22 कॅरेट सोन्याच्या दरात 900 रुपयांची घसरण पाहायला मिळाली.
नाशिकः नाशिकच्या (Nashik) सराफा बाजार पेठेमध्ये मंगळवारी (21 सप्टेंबर) 24 कॅरेट सोन्याचे (Gold) दर 10 ग्रॅममागे 46700 नोंदवले गेले. सोमवारच्या तुलनेत या दरामध्ये 400 रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 44200 नोंदवले गेले. सोमवारच्या तुलनेत या दरात 900 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. (In Nashik bullion market, the price of 24 carat gold is Rs 46,700 per 10 grams)
पितृपक्षामध्ये अनेक जण अनेक कामे करणे वर्ज्य मानतात. मात्र, गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करणे कमी करत नाहीत. सध्या नाशिकच्या सराफा बाजार पेठेमध्ये सोन्या-चांदीच्या दरात चढउतार सुरू आहे. गेल्या गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46900, तर चांदीचे दर किलोमागे 63000 रुपये नोंदवले गेले. शुक्रवारी यामध्ये घसरण पाहायला मिळाली. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46400, तर चांदीचे दर किलोमागे 61700 रुपये नोंदवले गेले. गुरुवारच्या तुलनेत सोमवारी सोने ग्रॅममागे 600 रुपयांनी स्वस्त झाले होते. मात्र, मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे (Gold) दर 10 ग्रॅममागे 46700 गेले. सोमवारच्या तुलनेत या दरामध्ये 400 रुपयांची वाढ झाली आहे. तर 22 कॅरेटच्या सोन्याचे दर मंगळवारी 10 ग्रॅममागे 44200 होते. सोमवारच्या तुलनेत या दरात 900 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. दुसरीकडे चांदीचे दर किलोमागे 63600 नोंदिवले गेले. सोमवारच्या तुलनेत या दरामध्ये 1100 रुपयांची वाढ नोंदवली गेली. दरम्यान, सोन्या-चांदीच्या या दरावर तीन टक्के जीएसटी लागू असेल. पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किंमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. HDFC सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.
‘केवायसी’ची मागणी
आता सोने व्यापारी अगदी 2 लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYC ची मागणी करत आहेत. तसेच दोन लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे. जेणेकरून आपल्याला भविष्यात ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, याची काळजी सराफा व्यापारी घेत आहेत.
‘गुगल पे’वर साठवून ठेवा
सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढेच नव्हे तर ‘गुगल पे’ वर सोने साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.
सराफा बाजार पेठेमध्ये मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 46700 नोंदवले गेले. 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅममागे 44200 नोंदवले गेले. सोमवारच्या तुलनेत या दरात 900 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. – गिरीश नेवासे, अध्यक्ष, सराफा असोसिएशन, नाशिक (In Nashik bullion market, the price of 24 carat gold is Rs 46,700 per 10 grams)
इतर बातम्याः
नाशिकः सांडपाण्यात वाहून गेला अन् नाल्याच्या जाळीत अडकला…गंगाघाटावर पोहणे पडले महागात