नाशिक पुन्हा गॅसवर; कोरोना रुग्णांत वाढ, हजाराचा टप्पा ओलांडला

नाशिक (Nashik) जिल्ह्यात कोरोना (corona) रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा एक हजाराच्या पुढे गेला आहे. सध्या जिल्ह्यात 1 हजार 22 रुग्णांवर (patients) उपचार सुरू आहेत.

नाशिक पुन्हा गॅसवर; कोरोना रुग्णांत वाढ, हजाराचा टप्पा ओलांडला
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 12:22 PM
नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यात कोरोना (corona) रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा एक हजाराच्या पुढे गेला आहे. सध्या जिल्ह्यात 1 हजार 22 रुग्णांवर (patients) उपचार सुरू आहेत. (In Nashik, the number of corona patients is again one thousand)
गेल्या काही दिवसांपासून  नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि निफाडमधील रुग्ण वाढत असल्याने ही दोन्ही ठिकाणे हॉटस्पॉट ठरत आहेत. सिन्नर आणि नगरची सीमारेषा जवळ आहे. यामुळे या भागात रुग्ण वाढत असल्याची शक्यता आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आजच्या अहवालानुसार जिल्ह्यातील 3 लाख 97  हजार 778  कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  सद्यस्थितीत 1 हजार 22  रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 611 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक 35,  बागलाण 12, चांदवड 40, देवळा 29, दिंडोरी 26, इगतपुरी 8, कळवण 3, मालेगाव 13, नांदगाव 8, निफाड 184, सिन्नर 293, सुरगाणा 2, त्र्यंबकेश्वर 11, येवला 69 अशा एकूण 733 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 267,  मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात 18  तर  जिल्ह्याबाहेरील 4 रुग्ण. आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 7 हजार 411 रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे 96.89 टक्के, नाशिक शहरात 98.15  टक्के, मालेगावमध्ये 97.06  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण97.74 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.64  इतके आहे. अहमदनगरमधील वाढत्या कोरोना रुग्णांची चिंता नाशिककरांना भेडसावते आहे. नगरमध्ये झपाट्याने रुग्ण वाढत आहेत. ते पाहता नाशिकमध्ये लक्ष ठेवावे. येथे कोरोना चाचण्या वाढवाव्यात, अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिल्या आहेत. कुंटे यांनी नाशिक, नगर, पुणे, ठाणे, सातारा जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लससाठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे लसीकरण वेगाने सुरू आहे. मात्र, दुसरीकडे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांना अक्षरशः हरताळ फासला आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये गर्दी होत आहे. पंचवटी, रामकुंड, शालीमार, अशोकस्तंभ, मुंबई नाका, नाशिकरोड, अशोकामार्ग, गंगापूररोड, महात्मानगर, दीपालीनगर, इंदिरानगरसह सर्वच भागात कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. विशेषतः बहुतांश जण मास्क वापरत नाहीत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढली, तर आटोक्यात आणणे मोठे आव्हान असणार आहे. (In Nashik, the number of corona patients is again one thousand)
Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.