नाशिकमध्ये चिकुन गुन्याचे थैमान; महिन्यापासून डेंग्यूचाही उद्रेक, स्वच्छता मोहीम राबवण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना

गेल्या महिन्यापासून डेंग्यूचा उद्रेक झाला असून, आता चिकुन गुन्यानेही थैमान घातल्याने नाशिककर त्रस्त झाले आहेत.

नाशिकमध्ये चिकुन गुन्याचे थैमान; महिन्यापासून डेंग्यूचाही उद्रेक, स्वच्छता मोहीम राबवण्याच्या पालकमंत्र्यांच्या सूचना
नाशिकमध्ये चिकुन गुन्याचे रुग्ण वाढले आहेत.
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 11:56 AM

नाशिकः गेल्या महिन्यापासून डेंग्यूचा उद्रेक झाला असून, आता चिकुन गुन्यानेही थैमान घातल्याने नाशिककर त्रस्त झाले आहेत.(Increase chikungunya, dengue patients in Nashik)

नाशिकमध्ये सध्या सातशेहून अधिक चिकुन गुन्याचे रुग्ण आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना देखील चिकुन गुन्याची लागण झाली आहे. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते. त्यामुळे शुक्रवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या बैठकीलाही ते नव्हते. या बैठकीत पालकमंत्र्यानी शहरात डास निर्मूलन आणि स्वच्छता मोहीम राबवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. नाशिककरांसाठी सप्टेंबर महिना पुन्हा एकदा आरोग्यासाठी घातक ठरत आहे. गेल्यावर्षी कोरोनाचा कहर होता. आता या वर्षी डेंग्यू आणि चिकुन गुन्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सप्टेंबर महिन्याच्या 14 तारखेपर्यंत शहरात डेंग्यूचे 140 नवे रुग्ण सापडले आहेत, तर चिकुन गुन्याचे 95 नवे रुग्ण सापडले आहेत. ऑगस्ट महिन्यात 311 डेंग्यूचे रुग्ण सापडले होते. तर चिकुन गुन्याचे 210 रुग्ण सापडले होते. नाशिकमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. कधी भुरभुर पाऊस सुरू असतो. तर कधी सरीवर सरी बरसत असतात. त्यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये डासांची उत्पत्ती झाली आहे. त्यामुळे डेंग्यूची साथ पसरली आहे.

हजारोंच्या घरात रुग्ण

नाशिकमध्ये 2017 मध्ये डेंग्यूचे 151 रुग्ण होते, तर चिकुन गुन्याचे 4 रुग्ण होते. 2018 मध्ये डेंग्यूच्या रुग्णांचा आकडा 368 वर गेला होता, तर चिकुन गुन्याचे 40 रुग्ण सापडले होते. 2019 मध्ये डेंग्यूचे रुग्ण 177 होते. या वर्षी चिकुन गुन्याच्या रुग्णांचे प्रमाण अत्यंत कमी होते. फक्त 1 रुग्ण सापडला होता. 2020 मध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 115 होती, तर चिकुन गुन्याच्या रुग्णांची संख्या 7 होती. मात्र, 2021 डेंग्यू आणि चिकुन गुन्याच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसते. सध्या शहरात डेंग्यू आणि चिकुन गुन्याचे रुग्ण हजारोंच्या घरात असल्याचे समजते.

वॉर्डनिहाय फवारणीची मागणी

सर्दी, ताप, खोकला, अंगदुखीचे रुग्ण वाढले आहेत. अनेक खासगी रुग्णालये हे डेंग्यू तसेच चिकुन गुन्याच्या रुग्णांनी भरली आहेत. बऱ्याच रुग्णालयात रुग्णांसाठी खाटा मिळत नसल्याचे चित्र आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चाच सुरू आहे. मात्र, सध्या तरी नाशिककरांना डेंग्यू आणि चिकुन गुन्याच्या साथीने हैराण केल्याचे दिसत आहे. महापालिकेने वॉर्डनिहाय फवारणी करावी, डासांच्या उत्पत्ती ठिकाणांवर फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (Increase chikungunya, dengue patients in Nashik)

इतर बातम्याः

मरणानेही छळले होते! नाशिक जिल्ह्यात स्मशानभूमी नसल्याने ताडपत्री धरून तरुणावर अंत्यसंस्कार

नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळीः’हस्ता’चे आजपासून ‘गुलाबी’ धुमशान; नाशिकला यलो, जळगावला रेड अलर्ट

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.