‘सर्व आनंद संपून जाईल, मात्र ईश्वराचा आनंद संपणार नाही’, कालीचरण महाराज नेमकं काय म्हणाले?
"जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या... सर्व भोगून घ्या... चांगल्या फुलाचा वास घ्या. नाकाचा सुगंध घ्या. हा सर्व आनंद संपून जाईल. मात्र ईश्वराचा आनंद संपणार नाही", असं कालीचरण महाराज म्हणाले.
कलीपुत्र कालीचरण महाराज यांच्या व्याख्यानाचे नाशिकमध्ये आयोजन करण्यात आलं. नाशिकच्या भद्रकाली परिसरात असलेल्या साक्षी गणेश येथे त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्ताने कालीचरण महाराजांच्या व्याख्यानाचे आयोजित करण्यात आले. “सध्याची परस्थिती आता दिसत आहे. पूर्वी काय होती आणि आता काय आहे, ह्या परस्थितीची परिपूर्ण जाणीव करून देतो. माणुसकी आपल्याला धर्म शिकवणार आहे. ज्यात धर्म नाही तो ढोर आहे. खाणे, पिणे, झोपने, सेक्स करणे हे लक्षण पशूंमध्ये असतात, ढोरांमध्ये आणि माणूसही करतो. भारत हिंदूराष्ट्र झाला पाहिजे का? लव जिहाद, लॅन्ड जिहाद संपला पाहिजे का? यावर कठोर कायदा झाला पाहिजे”, असं कालीचरण महाराज म्हणाले.
“महामुनी अगस्त्य ऋषी माझे गुरू आहेत. माझ्या रूममध्ये अगस्त ऋषी ब्रम्ह मुहूर्तावरण प्रगट झाले होते. त्यांनी काही गोष्टी सांगितल्याय. मी तुम्हाला सांगत आहे. आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. त्या तुमच्या पिढीला सांगा. जर तुम्ही आता सावरले नाहीत तर मारणार आहे. पण पिंडदानसाठी कोणीही उरणार नाही. मी वाईट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे”, असं कालीचरण महाराज म्हणाले.
कालीचरण महाराज नेमकं काय म्हणाले?
“धर्म म्हणजे काय आपला धर्म, त्यांचा धर्म. ज्याची धर्माप्रती निष्ठा नसते तो लोट्यासारखा नसतो. मधमाशीची प्रवृत्ती त्यांना सगळे घराबाहेर काढतात. मधमाशीचे मधुमक्षिका पालन होत आहे, एवढं सन्मान आहे. नाकातोंडातून आलेला बाहेर पदार्थ कप किंवा उलटी असते. पण आपण मध म्हणून वापरतो. आपण मधमाशीसारखे कसे बनू?”, असा प्रश्न कालीचरण महाराज यांनी केला.
“अध्यात्म विज्ञानानम.. अध्यात्म शब्दाचा काय अर्थ? ईश्वराच्या बाबतीत. धर्माच्या अनेक व्याख्या आहेत. देवाकडे जगातील सर्वात श्रेष्ठ गोष्ट मागितली पाहिजे. करोडो वेळा संभोग केल्यावर जो अंनाद मिळतो त्या पेक्षा जास्त आनंद हा मिळाला पाहिजे. त्यापेक्षा जास्त आनंद हा मिळाला पाहिजे. टार्गेट पूर्ण करून देणार. टार्गेट म्हणजे धर्म. जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या… सर्व भोगून घ्या… चांगल्या फुलाचा वास घ्या. नाकाचा सुगंध घ्या. हा सर्व आनंद संपून जाईल. मात्र ईश्वराचा आनंद संपणार नाही”, असं कालीचरण महाराज म्हणाले.
“धर्म सायन्स टार्गेट पूर्ण करून देणार, कल्पनांच्या आहारी जाऊन. अनंत कोटी ब्रम्हांडमध्ये एकच धर्म आहे तो म्हणजे सनातन हिंदू धर्म. याचे सहा भाग आहेत. ईश्वर प्राप्तीचे सहा मार्ग आहेत. पाहिला शैव, दुसरा वैष्णव, तिसरे श्कत देवीचे उपासक देवी म्हणजे शक्ती जैन, शीख, काही अर्ध्या हळकुंडत पिवळ्या झालेल्या लोकांनी यांना वेगळे धर्म केले. ईश्वर उद्दीष्ट्य असलं पाहिजे. हे टार्गेट असलं पाहिजे”, असं कालीचरण महाराज म्हणाले.