Kirit Somaiya : ‘आमदारांना घोडे म्हणण्याचं पाप गाढवच करू शकतात’, ‘घोडेबाजारा’वरून किरीट सोमैयांचा नाशकात शिवसेनेवर ‘बाण’

सचिन वाझे, बजरंग खरमाटे जर माफीचा साक्षिदार झाले आपल्या अडचणी वाढणार हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे. सचिन वाझेनी जर सांगितले, की माझी नियुक्ती उद्धव ठाकरेंमुळे झाली तर तुमचे काय होणार उद्धव ठाकरे असे किरीट सोमैया म्हणाले.

Kirit Somaiya : 'आमदारांना घोडे म्हणण्याचं पाप गाढवच करू शकतात', 'घोडेबाजारा'वरून किरीट सोमैयांचा नाशकात शिवसेनेवर 'बाण'
शिवसेनेवर आरोप करताना किरीट सोमैयाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 12:59 PM

नाशिक : आमदारांचा घोडेबाजार महाराष्ट्रात सुरू आहे. तर सामनाचे संपादक आणि पोलीस महासंचालक यांना विनंती आहे, की त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून माहिती घेऊन बाजार मांडणाऱ्यांवर कारवाई करावी. निवडणुकीत भ्रष्टाचार होत असेल तर तो गुन्हा आहे. मात्र अशाप्रकारे आमदारांना घोडे म्हणण्याचे काम गाढवच करू शकतात, अशी टीका भाजपा नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya) यांनी केली आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. रश्मी ठाकरे तसेच अजित पवार यांच्यासह शिवसेना राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत किरीट सोमैया यांनी टीका केली आहे. आमदारांचा घोडेबाजार भाजपा करत असल्याची टीका सत्ताधारी पक्षाकडून होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमैया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) टीका केली आहे.

‘बेईमान कोण?’

घोडेबाजारावरून त्यांनी लक्ष्य करत म्हटले, की मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे, की त्यांच्या वर्तमानपत्रात आलेली माहिती त्यांनी निवडणूक आयोग, पोलीस यांना द्यावी. मुख्यमंत्र्यांचे स्टेटमेंट घ्यावे, सामनाच्या संपादकांचे स्टेटमेंट घ्यावे आणि कारवाई करावी, असे आव्हान त्यांनी दिले आहे. पुढे ते म्हणाले, की बेईमान कोण सेनेचे आमदार, त्यांना समर्थन देणारे आमदार की नेते बेईमान, असा सवाल त्यांनी केला आहे.

उद्धव ठाकरेंना वाटते ‘मेरा क्या होगा?’

सचिन वाझेला सीबीआयने माफीचा साक्षिदार होण्यास मंजुरी दिली आहे. सचिन वाझे बोलू लागले तर उद्धव ठाकरेंना भीती वाटते ‘मेरा क्या होगा?’ तेरा क्या होगा कालिया? जर वाझेंनी सांगितले, की दापोलीच्या रिसॉर्टचे पैसे कोणी दिले, सचिन वाझेच्या वसुलीमधून कॉन्टॅक्टरचे पैसे दिले, असे जर वाझेंनी सांगितले तर तुमचे काय होणार उद्धव ठाकरे, असा सवाल सोमैयांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

हे सुद्धा वाचा

‘काय म्हणाले किरीट सोमैया?’

‘बजरंग खरमाटे म्हणजे अनिल परब यांचा वाझे’

सचिन वाझे, बजरंग खरमाटे जर माफीचा साक्षिदार झाले आपल्या अडचणी वाढणार हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे. सचिन वाझेनी जर सांगितले, की माझी नियुक्ती उद्धव ठाकरेंमुळे झाली तर तुमचे काय होणार उद्धव ठाकरे असेही सोमैया म्हणाले. बजरंग खरमाटे म्हणजे अनिल परब यांचा वाझे, असा आरोप त्यांनी केला.

‘श्रीजी होम कोणाची?’

शिवाजी पार्कसमोर उभी असलेली रिकामी इमारत असलेली श्रीजी होम कोणाची आहे, असा सवाल करत ईडीकडे सगळी कागदपत्रे दिली आहेत. श्रीजी होम्स कंपनी अजूनही रजिस्टर झालेली नाही. उद्धव ठाकरे, त्यांचे नातेवाईक श्रीधर पाटणकर, राहुल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी मिळून श्री जी होम्स बनवली, असा आरोप सोमैयांनी केला.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.