Lemon Price Hike : गल्लीपासून दिल्लीपर्यंत महागाईचा पारा वाढला; लिंबाचे भाव किलोमागे अडीचशे रुपयांवर

मोबाइलचे रिचार्ज अडीचशे रुपयात महिनाभर मिळत असेल, पण आता चक्क आता वीस-तीस रुपयांत मिळणाऱ्या किलोभर लिंबूसाठी कधी दोनशे तर कधी अडीचशे रुपये मोजावे लागतायत. महागाईच्या या झळांनी नाशिककर आणि जळगावकर मेटाकुटीला आलेत. त्यामुळे शरबताऐवजी फक्त थंड पाण्यावर ते समाधान मानून घेतायत.

Lemon Price Hike : गल्लीपासून दिल्लीपर्यंत महागाईचा पारा वाढला; लिंबाचे भाव किलोमागे अडीचशे रुपयांवर
लिंबू झाले महाग.
Follow us
| Updated on: Apr 16, 2022 | 9:39 AM

नाशिक/जळगावः गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आणि नाशिक-जळगावपासून ते थेट मुंबईपर्यंत (Mumbai) उन्हासोबतच महागाईचा (Inflation) पारा दिवसेंदिवस चढताना दिसतोय. त्यामुळे एकीकडे तापमान 44 अंशाच्या पुढे जाताना दिसते आहे. तर या उकाड्यापासून कच्चा बदाम…गाणं ऐकत का होईना लिंबू (Lemon) शरबत प्यावं म्हणलं, तर ते ही सामान्यांना अनेकदा शक्य होताना दिसत नाहीय. मोबाइलचे रिचार्ज अडीचशे रुपयात महिनाभर मिळत असेल, पण आता चक्क आता वीस-तीस रुपयांत मिळणाऱ्या किलोभर लिंबूसाठी कधी दोनशे तर कधी अडीचशे रुपये मोजावे लागतायत. महागाईच्या या झळांनी नाशिककर आणि जळगावकर मेटाकुटीला आलेत. त्यामुळे शरबताऐवजी फक्त थंड पाण्यावर ते समाधान मानून घेतायत.  अहो, जळगाव, नाशिकच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्रात हीच गत आहे. त्यामुळे या महागाईपासून दिलासा कधी मिळणार, याचाच प्रश्न ज्याच्या-त्याच्या ओठी आहे. मात्र, त्याचे उत्तर काही केल्या मिळताना दिसत नाहीय.

नाशिकमध्येही तोच कित्ता…

जळगावमध्ये लिंबू महाग झाले आहेतच, तर दुसरीकडे नाशिकमध्येही लिंबाचे दर किलोमागे अडीचशे रुपयांवर गेले आहेत. एकीकडे अवकाळी पाऊस आणि बेभरवशाचा निसर्ग यामुळे लिंबाच्या उत्पादनात घट झालेली पाहायला मिळत आहेत, तर दुसरीकडे हॉटेल व्यावसायिक आणि प्रत्येक घरातही लिंबाची मागणी वाढलीय. या मागणी आणि पुरवठ्यातील या असमतोलामुळेही लिंबाच्या दरात वाढ होताना दिसतेय. त्यामुळे आगामी काही दिवस, कदाचित या पूर्ण उन्हाळ्यात लिंबाचे दर चढेच राहण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

इंधन दरवाढीचा फटका…

इंधन दरवाढीचा फटकाही सध्या बसताना दिसतोय. पेट्रोल-डिझेल यांच्या किमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे साऱ्याच वाहतुकीवर त्याचा गंभीर परिणाम होताना दिसतोय. तेलापासून भाजीपर्यंत आणि धान्यापासून ते थेट बांधकाम साहित्यापर्यंत साऱ्याचे दर कितीतरी पटीने वाढतायत. दुसरीकडे युक्रेन आणि रशियाचे युद्ध सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात क्रूड ऑइलचे दर लवकर कमी होतील, ही शक्यता नाही. या साऱ्याचा फटका बसल्याने महागाई वाढताना दिसतेय. सामान्यांचा खिसा दिवसेंदिवस रिकामा होत चाललाय. हे सारे थांबणार कधी, याकडेच त्यांचे डोळे लागलेत.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.