नाशिकमध्ये वैद्यकीय पर्यटनाचे हब निर्माण करु; ध्वजारोहणप्रसंगी पालकमंत्री भुजबळांची ग्वाही

नाशिकचे उत्तम हवामान व सुसंस्कृत राहणीमान ही ओळख टिकवून नाशिकमध्ये वैद्यकीय पर्यटनाचे हब निर्माण करण्याचा मानस आहे, असे मत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी व्यक्त केले आहे.

नाशिकमध्ये वैद्यकीय पर्यटनाचे हब निर्माण करु; ध्वजारोहणप्रसंगी पालकमंत्री भुजबळांची ग्वाही
Follow us
| Updated on: Aug 15, 2021 | 4:52 PM

नाशिक : नाशिकचे उत्तम हवामान व सुसंस्कृत राहणीमान ही ओळख टिकवून नाशिकमध्ये वैद्यकीय पर्यटनाचे हब निर्माण करण्याचा मानस आहे. तसेच आज सर्वांनी जात, धर्म, प्रांत, लिंगभेद विसरुन कोरोनासारख्या विषाणूचा एकजुटीच्या भावनेने सामना करण्याचे आवाहन, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी केले आहे. नाशिक रोडच्या विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते संपन्न झाले, त्यावेळी पालकमंत्री भुजबळ बोलत होते. (Let’s create a medical tourism hub in Nashik : Chhagan Bhujbal)

याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार सरोज अहिरे, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या संचालिका अश्वती दोरजे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, माजी मंत्री शोभा बच्छाव उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, क्रांतीकारक, स्वातंत्रसैनिकांनी जसे देशाला ब्रिटीशांच्या तावडीतून मुक्त करुन स्वरुन स्वातंत्र्य मिळवून देण्याचा चंग बांधला होता. त्याप्रमाणे आज स्वातंत्र्यदिनी सर्वांना एकजूट व ऐक्यातून देशाला, राज्याला, जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन पालकमंत्री भुजबळ यांनी सर्व नागरिकांना केले आहे. नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व पदव्यूत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था देशात रोल मॉडेल ठरेल अशा पध्दतीने विकसित करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

सर्व यंत्रणेच्या अहोरात्र मेहनतीने जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. कोरानाकाळात आपली आरोग्य व्यवस्था बळकटीकरणावर भर देवून नवीन ऑपरेशन थिएटर्स, ऑक्सिजन प्लांट, सर्व सुविधांनी युक्त प्रयोगशाळा कमी कालावधीत पूर्ण करण्यात येत आहे. तसेच म्युकरमायकोसिस सारख्या आजाराला प्रशासन व आरोग्य विभागाने प्रभावीपणे नियंत्रणात आणले असल्याचे सांगत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी समाधान व्यक्त केले.

5 कोटी थाळी वाटपाचा टप्पा पार

कोरानासारख्या संकटकाळात कुणाचीही उपासमार होवू नये यासाठी अन्न्, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यात 1 हजार 167 शिवभोजन केंद्रामार्फत 5 कोटी थाळी वाटपाचा टप्पा पार केला आहे. त्याचबरोबर 15 एप्रिल 2021 पासून गरीब व गरजू जनतेला शिवभोजन थाळी नि:शुल्क उपलब्ध करुन दिली जात असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

ई-पीक पाहणी सुरु

आज स्वातंत्र्यदिनी ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्प राज्यभर सुरु करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन पीक कर्ज, पीक विमा अशा योजनांचा लाभासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईल ॲपच्या आधारे स्वत: पीक पेरणीची माहिती तलाठ्याकडे पाठविता येणार आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सातबारा व खाते उतारा थेट वेब पोर्टलवरून ऑनलाईन उपलब्ध करून देण्याची सुविधा महसूल प्रशासनाने विकसित केली आहे. तसेच ई-फेरफार प्रणालीमध्ये अनोंदणीकृत व नोंदणीकृत फेरफार यांची प्रलंबित संख्या कमी करण्याच्या कामात नाशिक महसूल विभाग आघाडीवर असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

अभिलेखांच्या स्कॅनिंग प्रकल्पाचे काम पूर्ण

नाशिक विभागातील आत्महत्याग्रस्त पात्र शेतकरी कुटुंबियांच्या वारसांना सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून उभारी योजनेच्या माध्यमातून मदत करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्षामार्फत 1 हजार 341 अर्जांचे निराकरण करण्यात आले आहे. डिजिटल इंडिया आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात अभिलेखांच्या स्कॅनिंग प्रकल्पाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले असल्याचे पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले.

कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांना 5 लाख मंजूर

कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या 24 बालकांना प्रत्येकी पाच लाख रुपये सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. संगोपन योजनेंतर्गत एकूण 531 बालकांना दरमहा अकराशे रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. लोकसेवा हक्क अधिनियम कायद्याद्वारे 100 सेवा देणारा नाशिक हा राज्यातील एकमेव जिल्हा असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

वैद्यकीय पर्यटनाचं जाळं म्हणजे काय?

वैद्यकीय पर्यटन म्हणजे आरोग्य व्यवस्थेचं जाळं उभारणार. म्हणजेच नाशिकमध्ये आधुनिक उपचाराच्या सुविधा उपलब्ध करण्यात येणार. तिथे सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार मिळतील. तसेच विविध आजारांवरील औषधांचं संशोधन करण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर सुविधा निर्माण करून दिल्या जाणार आहेत. त्याशिवाय, वैद्यकीय महाविद्यालये उभी करून तरुणांना वैद्यकीय शिक्षण, वैद्यकीय व्यवसाय आणि संशोधनाकडे वळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

इतर बातम्या

काही लोक म्हणत असतील 75 वर्षात काहीच घडलं नाही, पण…; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांचा भाजपवर निशाणा

असे राज्यपाल येऊ शकतील असं बाबासाहेबांनाही वाटलं नसेल; मुश्रीफ यांचा राज्यपाल कोश्यारींना खोचक टोला

मोदी म्हणतात, भारत-पाक फाळणीचा स्मृती दिन साजरा करणार; पटोले म्हणातात, हा तर देशांतर्गत फाळणीचा डाव

(Let’s create a medical tourism hub in Nashik : Chhagan Bhujbal)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.