Unlock Updates : वडेट्टीवारांकडन अनलॉकची घोषणा, पुणे आणि नाशिकमध्ये नव्या नियमांनी काय बदल होणार?

नाशिकचा पहिल्या टप्प्यात समावेश झाल्याने नाशिकचे महापौर यांनी समाधान व्यक्त केलं. तसेच नाशिक महापालिका प्रशासन तिसऱ्या लाटेसाठी सज्ज असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

Unlock Updates : वडेट्टीवारांकडन अनलॉकची घोषणा, पुणे आणि नाशिकमध्ये नव्या नियमांनी काय बदल होणार?
महाराष्ट्र लॉकडाऊन
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 9:24 PM

नाशिक : राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील जिल्ह्यांची कोरोना संसर्ग दरानुसार केलेल्या वर्गवारीत नाशिक जिल्ह्यात अनलॉक करण्यात आला. पुण्याचा संसर्ग दरही कमी झाल्याचं सांगितलं मात्र तेथील निर्बंध कायम ठेवले. यानंतर नाशिकचा पहिल्या टप्प्यात समावेश झाल्याने नाशिकचे महापौर यांनी समाधान व्यक्त केलं. तसेच नाशिक महापालिका प्रशासन तिसऱ्या लाटेसाठी सज्ज असल्याचंही त्यांनी नमूद केलं (Lockdown Unlock updates of Nashik Pune after Vijay Wadettiwar announcement).

नाशिक पालिका आयुक्तांनी सांगितलं, “शेवटी लॉकडाऊन किती दिवस करणार आहेत. याला आता महिना दीड महिना होत आलाय. लॉकडाऊनमुळे संपूर्ण परिस्थिती हाताबाहेर गेलीय. त्यामुळे आता जबाबदारी नाशिककरांची आहे. नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तिसऱ्या लाटेसाठी महापालिका सज्ज आहे.”

पुण्यातही गोंधळाचीच स्थिती

दरम्यान आज (3 जून) राज्यात अनलॉकवरुन जसा गोंधळ पाहायला मिळाला तसाच गोंधळ याआधी पुण्यातही पाहायला मिळाला होता. राज्याच्या पातळीवर नवी नियमावली जाहीर झाल्यानंतर पुण्याच्या महापौरांनी सलून, स्पा आणि जिम सुरु होतील असं म्हटलं. मात्र, आयुक्तांनी राज्य सरकारच्या नियमांचा हवाला देत सलून, स्पा आणि जिम सुरू करता येणार नसल्याचं स्पष्ट केलं. यानंतर महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही स्पष्टीकरण द्यावं लागलं.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, “सलून, स्पा, जिम बंद राहणार! पुणे मनपा हद्दीत आपण निर्बंध शिथिल केले असले तरी राज्य सरकारच्या आदेशानुसार सलून, पार्लर, स्पा, जिम बंद ठेवण्यात येत आहे. सलून आणि पार्लर सुरु ठेवण्याचा निर्णय आपण स्थानिक पातळीवर घेतला होता. मात्र राज्य सरकारच्या निर्देशानुसार बदल करण्यात आला आहे.”

पुण्यात काय सुरु राहणार?

1. सकाळी 7 ते दुपारी 2 यावेळेत पुण्यात सर्व प्रकारची दुकाने सुरु राहणार 2. शासकीय कार्यालये 25 टक्के क्षमतेने सुरु राहणार 3. रेस्टॉरंट व बार हे फक्त पार्सल/घरपोच सेवेसाठी दिनांक 14 एप्रिलच्या आदेशानुसार सुरु राहतील. 4. पुणे महानगर पालिका क्षेत्रातील सर्व बँका कामाचे सर्व दिवस सुरु राहतील 5. पुणे महानगरपालिका क्षेत्रातील मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 ते दुपारी ०२.०० वाजेपर्यंत सुरु राहतील. 6. कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना (बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हे आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहतील. 7. ई-कॉमर्समार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू (Essential / Non-essential) यांची घरपोच सेवा (Home Delivery) सुरु करणेस मुभा राहील.

पुण्यात काय बंद असणार?

1. पुण्यातील उद्याने, मैदान, मंगल कार्यालय, पीएमपीएमएल बससेवा, सलून, जिम बंद राहणार 2. शनिवार आणि रविवार सकाळी 7 ते 2 यावेळेत फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु राहणार, अन्य दुकाने बंद ठेवली जाणार. 3. दुपारी तीन वाजल्यानंतर नागरिकांना अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही

हेही वाचा :

ठाकरे सरकारचा गोंधळात गोंधळ, निर्बंध अद्याप हटवले नाहीत, CMO चं स्पष्टीकरण

Mumbai Local : ठाण्यातील लॉकडाऊन हटवला, आता लोकल रेल्वे धावणार की नाही?

महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवला, राज्यात 5 टप्प्यात शिथीलता देणार

व्हिडीओ पाहा :

Lockdown Unlock updates of Nashik Pune after Vijay Wadettiwar announcement

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.