वादग्रस्त वक्तव्य करणारे महंत रामगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर
वादग्रस्त वक्तव्य करणारे महंत रामगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये एकाच मंचावर बसलेले बघायला मिळाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांचा आज नाशिकचा नियोजित दौरा आहे. एकनाथ शिंदे एका सप्ताच्या कार्यक्रमासाठी नाशिकला गेले आहेत. त्याच कार्यक्रमात महंत रामगिरी महाराज उपस्थित आहेत.
वादग्रस्त वक्तव्यानंतर महंत रामगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर आलेले बघायला मिळाले. रामगिरी महाराज यांनी आपल्या प्रवचनादरम्यावन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर येथे मोठा जमाव रस्त्यावर उतरला. आंदोलकांनी महंत रामगिरी महाराज यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या सर्व घडामोडी एकीकडे घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महंत रामगिरी महाराज एकाच मंचावर आलेले बघायला मिळाले. विशेष म्हणजे या मंचावर भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन, माजी खासदार सुजय विखे पाटील देखील मंचावर उपस्थित असल्याचं बघायला मिळालं. शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे हे देखील यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सप्ताहच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आले. एकनाथ शिंदे यांचा हा नियोजित दौरा होता.
नाशिकच्या सिन्नरमधील पंचालेन येथे हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात महंत रामगिरी महाराज आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर बघायला मिळाले. यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडून महंत रामगिरी महाराजांच्या कामांचं कौतुक करण्यात आलं. रामगिरी महाराजांनी अनेक कुटुंबांना दिशा दिली, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. वारकरी संप्रदायाकडून समाज प्रबोधनाचं काम झालं, असंदेखील मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
एकनाथ शिंदे रामगिरी महाराजांबद्दल नेमकं काय म्हणाले?
“यावर्षी आषाढीला गेल्या वर्षापेक्षा जास्त दुप्पट लोकं होती. गेल्यावर्षी वारीला 15 लाख वारकरी होते. यावर्षी 25 लाख वारकरी होते. वारकरी संप्रदायाची ही ताकद, महाराष्ट्रात कीर्तनाच्या माध्यमातून गावागावात समाज प्रबोधनासाठी वापरली जाते. खरं म्हणजे अनेक कटुंब दु: खातून सावरलेली आपण पाहतो. त्यांना दिशा देण्याचं काम रामगिरी महाराजांसारखे संत करत असतात. म्हणून या जागेवर देवाचा वास आणि आशीर्वाद आहे. पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, म्हणून एवढ्या उन्हात तुम्ही बसलेला आहात”, असं एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले.