AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदान 2021: गुलाबराव पाटलांच्या गावात ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना’, शिवसैनिक स्वकियांविरोधात मैदानात

Maharashtra gram panchayat elections 2021 : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी खुर्द गावात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. (Gulabrao Patil Paladhi Khurd)

महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदान 2021: गुलाबराव पाटलांच्या गावात 'शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना', शिवसैनिक स्वकियांविरोधात मैदानात
गुलाबराव पाटील, पाणी पुरवठा मंत्री
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 7:43 PM

जळगाव: शिवसेना नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यांच्या पाळधी खुर्द गावात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना यश आलं नाही. पाळधी खुर्द गावात आता शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना रंगला आहे. याठिकाणी ‘विकास’ आणि ‘परिवर्तन’ असे दोन पॅनल एकमेकांच्या विरोधात असून, कोणते पॅनल बाजी मारते? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी गावातील निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले, पण ते निष्फळ ठरल्याने याठिकाणी शिवसेनेच्या स्वकियांमध्येच लढत रंगली आहे. (Maharashtra gram panchayat elections 2021 Shivsena two groups fight in Paldhi Khurd village of Gulabrao Patil )

शिवसैनिकच आमने सामने

‘खान्देशची मुलुख मैदान तोफ’ म्हणून शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांची राज्यभर ओळख आहे. शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून राज्याच्या राजकारणात यशस्वी डावपेच आखण्यात त्यांची हातोटी असल्याचे मानले जाते. परंतु, आपल्या गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत त्यांचे डावपेच फसल्याचे पाहायला मिळत आहे. पाळधी बुद्रुक हे गुलाबराव पाटील यांचे मुळगाव आहे. या गावाचाच दुसरा भाग असलेल्या पाळधी खुर्द गावातील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या दोन्ही गावांमध्ये गुलाबराव पाटील यांचे म्हणजेच, शिवसेनेचे वर्चस्व आहे. मात्र, असे असताना गुलाबराव पाटील यांना पाळधी खुर्दची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात अपयश आले. त्यामुळे याठिकाणी शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आता जनमताचा कौल कोणाच्या बाजूने असेल, याची उत्सुकता आहे.

विकासाच्या मुद्द्यावरून गाजतेय निवडणूक

पाळधी खुर्द ग्रामपंचायतीत गेल्या 25 वर्षांपासून शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे शरद कासट यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आहे. यावेळी त्यांना शिवसेनेचेच कार्यकर्ते व गुलाबराव पाटील यांचे समर्थक असलेले दिलीप पाटील यांनी आव्हान उभे केले आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून प्रयत्न केले. परंतु, त्यात यश आले नाही. 25 वर्षे एकहाती सत्ता असूनही गावाच्या विकासाचा अनुशेष कायम असल्याचा मुद्दा उपस्थित करत निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं दिलीप पाटील यांनी सांगितले. विकासाच्या मुद्यावर समर्थकांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं दिलीप पाटील यांनी सांगितले. अखेर, याठिकाणी शरद कासट यांनीही उमेदवारी करण्याचे ठरवल्याने स्वकियांमध्येच लढत रंगली आहे.

सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट्स, पाहा गुड मॉर्निंग महाराष्ट्र, दररोज सकाळी 7 वा. @TV9Marathi वर

जळगाव जिल्ह्यात 783 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक

जळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदान सुरु आहे. जिल्ह्यातील 783 ग्रामपंचायतींच्या 5 हजार 154 जागांसाठी आज (शुक्रवारी) मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. जिल्हाभरात 5 हजार 154 जागांसाठी एकूण 13 हजार 847 उमेदवार रिंगणात आहेत.

संबंधित बातम्या:

Maharashtra Gram Panchayat Elections 2021 Voting LIVE : मतदानाला काही तास शिल्लक असताना उमेदवाराचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदान 2021: जामनेरच्या देवपिंप्रीत चाकू हल्ला, पिस्तूल रोखून धमकावलं

(Maharashtra gram panchayat elections 2021 Shivsena two groups fight in Paldhi Khurd village of Gulabrao Patil )

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.