होय, शिवसेना पक्षप्रमुख शिवसेनेचे गँग प्रमुखच, सुधीरभाऊ, नादाला लागू नका; गुलाबराव पाटलांचा इशारा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानमित्ताने केलेल्या भाषणावर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे. त्याला शिवसेना नेते गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
जळगाव: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानमित्ताने केलेल्या भाषणावर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे. त्याला शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख हे शिवसेनेचे गँग प्रमुखच आहेत. गँग प्रमुखाने नुसता आदेश दिला तरी काय होते, हे सर्वांना माहीतच आहे. त्यामुळे गँग प्रमुखांच्या नादाला लागू नका, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी सुधीर मुनगंटीवार यांना दिला आहे. (Maharashtra Minister gulabrao patil slams sudhir mungantiwar on Uddhav Thackeray Speech )
गुलाबराव पाटील यांनी मीडियाशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘शिवसेना पक्षप्रमुख हे शिवसेनेचे गँग प्रमुखच आहेत. त्या गँग प्रमुखाच्या बापाने काय केलंय, हे अख्ख्या महाराष्ट्राला आणि जगाला माहिती आहे. गँग प्रमुखाच्या नादाला लागू नका. कारण गँग प्रमुखाने नुसता आदेश दिला, तरी बाकी काय होते हे मुंबईच्या सेना भवनासमोर सर्वांनी पाहिले आहे, अशा शब्दांत पाटील यांनी इशारा दिला आहे. शिवसेनेचा काल वर्धापन दिन साजरा झाला. वर्धापन दिनानिमित्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाषण केले होते. त्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली होती. ‘हे सत्ता प्रमुखाचे नव्हे तर गँग प्रमुखाचे भाषण आहे’, अशी टीका त्यांनी केली होती.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने उद्धव ठाकरे यांनी काल शिवसैनिकांना संबोधित केलं होतं. “दोन दिवसांपासून शिवसेनाप्रमुखांचं एक भाषण व्हायरल होतंय. ते का होतंय हे आपल्याला माहितीय. याला शिवसैनिक म्हणतात. नुसत्या हाणामाऱ्या करणं हे आपलं काम नाही. रक्तपात करणं हे आपलं गुणधर्म नाही. अन्यायावर वार करणारा शिवसैनिक आहे. पण रक्तपाताची ओळख मुद्दामून कोणी करुन देत असेल, तर रक्तदान करणाऱ्या शिवसैनिकाची ओळख अनेकांना आहे, 1992-93 च्या दंगलीत शिवसैनिक रस्त्यावर उतरला नसता तर मुंबई वाचली नसती. ही सुद्धा शिवसेनेची ओळख. ज्या ज्या वेळी रक्तदान करण्याची वेळ येते, त्यावेळी शिवसैनिक सर्वात आधी पुढे येतो. हे आमचं हिंदुत्व आहे, आमचं रक्तदान सर्वधर्मीयांसाठी आहे”, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिवेसना भवनसमोर झालेल्या गदारोळावर प्रतिक्रिया दिली होती.
ते एका गँग प्रमुखाचं भाषण
आम्ही गुंड आहोत अशी भाषा करायची आणि काँग्रेसने स्वबळावर लढण्याची भाषा केल्यावर त्यांना जोड्यानं हाणायची भाषा करायची, हे आश्चर्यकारक आहे. आपल्या भाषणात त्यांनी हिंदुत्व काय हे सांगितलं. ते लोकांना माहीतही आहे. पण हिंदुत्वाबद्दलची तुमची भूमिका काय आहे हे तरी सांगा? उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण भाषण सत्तेच्या खुर्चीच्या आसपास घुटमळणारं होतं. आपल्या भूमिकेंच उदात्तीकरण करणारं होतं. मला वाटतं हे सरकारच्या प्रमुखाचं भाषण नव्हतंच, ते एका गँग प्रमुखाचं भाषण होतं, अशी खोचक टीका मुनगंटीवार यांनी ट्विट करून केली होती. (Maharashtra Minister gulabrao patil slams sudhir mungantiwar on Uddhav Thackeray Speech )
100 SuperFast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 20 June 2021 https://t.co/QXg3iYNjRy #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 20, 2021
संबंधित बातम्या:
हाणामारी, रक्तपात हा आपला गुणधर्म नाही, मुंबई दंगलीवेळी शिवसैनिक जगाने पाहिला : उद्धव ठाकरे
‘…यालाच शिवसैनिक म्हणतात’, दादरमधील राड्यावर उद्धव ठाकरेंचा अप्रत्यक्ष निशाणा
एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला तर लोक जोड्याने हाणतील; उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला अप्रत्यक्ष इशारा
(Maharashtra Minister gulabrao patil slams sudhir mungantiwar on Uddhav Thackeray Speech )