AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Unlock | नाशिकमध्ये आता सर्व दुकाने 4 वाजेपर्यंत सुरु राहणार, शनिवार-रविवार पूर्णपणे बंद, नवे नियम नेमके काय?

कोरोनाची दुसरी लाट आता महाराष्ट्रातून ओसरताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे (Nashik Lockdown new guidelines).

Nashik Unlock | नाशिकमध्ये आता सर्व दुकाने 4 वाजेपर्यंत सुरु राहणार, शनिवार-रविवार पूर्णपणे बंद, नवे नियम नेमके काय?
Follow us
| Updated on: Jun 05, 2021 | 8:45 PM

नाशिक : कोरोनाची दुसरी लाट आता महाराष्ट्रातून ओसरताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पॉझिटिव्हीटी रेटच्यानुसार वर्गीकरण करुन निर्बंध घालण्यात आले आहेत. या वर्गीकरणात नाशिक तिसऱ्या टप्प्यांमध्ये आहे. त्यामुळे त्यानुसार आता नाशिक जिल्ह्यामध्ये शिथिलता देण्यात येणार आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्वत: याबाबत माहिती दिली. भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकमधील सर्व दुकाने आता संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. याबाबत जिल्हाधिकारी सुरज मांढरे लवकरच आदेश काढणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली  (Nashik Lockdown new guidelines).

भुजबळ यांच्या माहितीनुसार नाशिकमध्ये काय सुरु, काय बंद राहणार?

– सर्व दुकान,आस्थापना 4 वाजे पर्यँत सुरू राहणार – शनिवार, रविवार पूर्णतः बंद ठेवण्याचा विचार – सोमवार पासून नवीन नियमावली लागू होणार – मॉल्स, थेटर्स, नाट्यगृह बंद राहणार – हॉटेल 50 टक्के क्षमतेने दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील, नंतर पार्सल सेवा सुरू होणार – ओपन गार्डन, जॉगिंग ट्रॅक सकाळी 5 ते 9 पर्यंत सुरू राहणार – गव्हर्नमेंट ऑफिसेस 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार – लग्न 50 लोक, अंत्यविधी 20 लोक, तसेच मीटिंग 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार – बांधकाम 4 वाजे पर्यंत सुरू राहील – नाशिक जिल्ह्यात रात्री 12 ते दुपारी 5 पर्यंत जमावबंदी लागू असेल, त्यानंतर 5 ते रात्री 12 पर्यंत संचारबंदी लागू असेल – लवकरच जिल्हाधिकारी सुरज मांढरे आदेश काढणार

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आज बैठक घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील आणि नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील पॉझिटिव्हिटी रेट तसेच ऑक्सीजन बेडची उपलब्ध संख्या विचारात घेण्यात आली. पॉझिटिव्हिटी रेटमध्ये वेळोवेळी होणारे बदल तसेच मागील वर्षी निर्बंध शिथिल झाल्यानंतर तातडीने वाढलेली रुग्णसंख्या या सर्व बाबींचा सारासार विचार करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने लेवल 3 प्रमाणे निर्बंध ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला आहे (Nashik Lockdown new guidelines).

लेवल 3 मधील बाबी जिल्ह्यात कशाप्रकारे लागू करण्यात येतील. याबाबत सविस्तर आदेश यथाशीघ्र पारित करण्यात येतील आणि सोमवार पासून लागू होतील. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशानुसार सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून उद्योग व्यवसाय सुरू करावेत, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.

छगन भुजबळ यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

“जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी जिल्ह्यातील म्युकरमायकोसिस आजारातून शस्त्रक्रियेद्वारे बरे झालेल्या परंतु एखादा अवयव कायमस्वरूपी बाधित झालेल्या रुग्णांची सविस्तर माहिती घेण्यात यावी. तसेच तिसऱ्या स्तरातील निर्बंधच्या काळात कामावर जाणाऱ्या कोणालाही त्रास होणार नाही, यासोबतच शहरातील ज्या रस्त्यांवर अवाजवी गर्दी होते त्याठिकाणी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी नियोजन करावे”, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

संबंधित बातम्या :

Maharashtra Unlock | महाराष्ट्रात 7 जूनपासून अनलॉक, 5 टप्प्यात लॉकडाऊन हटवणार, मध्यरात्री आदेश जारी

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.