राज्यात अद्याप समाधानकारक पाऊस नाही, मनमाडमध्ये पेरण्या खोळंबल्या, बळीराजा चिंतेत

राज्यात बऱ्याच जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असली, तर मनमाड परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत.

राज्यात अद्याप समाधानकारक पाऊस नाही, मनमाडमध्ये पेरण्या खोळंबल्या, बळीराजा चिंतेत
farmer
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 12:01 PM

रईस शेख, टीव्ही 9 मराठी, मनमाड : राज्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. राज्यात बऱ्याच जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असली, तर मनमाड परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. तर दुसरीकडे सुरुवातीच्या पावसावर शेतात पेरलेले पीक वाया जाऊ लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. यामुळे बळीराजा चिंतेत दिसत आहे. (Maharashtra no satisfactory rain sowing has been delayed Farmers in Worry)

दुबार पेरणीचे संकट

जून महिना संपून जुलै महिन्याचा पहिला आठवडाही संपत आला. मात्र अद्याप मनमाडसह नांदगाव तालुक्यात हवा तेवढा पाऊस पडताना दिसत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. गेल्या महिन्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पण गेल्या महिन्याभरात पाऊसच न झाल्याने दुबार पेरणीचे संकट समोर ठाकलं आहे.

बळीराजा पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता

मान्सूनचा हंगाम एक महिना पुढे ढकलला गेला आहे. त्यामुळे पुढे घेण्यात येणारे पीक हे उशिरा होणार असल्याने त्याचा आर्थिक फटका बसणार आहे, असे अनेक शेतकऱ्यांचे मत आहे. दरम्यान पुढील काही दिवसात पाऊस न झाल्यास बळीराजा पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

पावसाअभावी 75 ते 80 टक्के पेरणी खोळंबल्या

नाशिक जिल्ह्यात जूनमध्ये सरासरी 308.90 टक्के इतका पाऊस होतो.  यंदा जून आणि जुलै महिन्यात 16.84 टक्के इतकाच पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, मनमाड-नांदगाव, चांदवड, सटाणा, बागलाण हे तालुके अद्याप कोरडेच आहेत. तर नाशिक ग्रामीणमध्ये खरिपाची सुमारे 20 ते 25 टक्के पेरणी झाली आहे. या ठिकाणी पावसाअभावी 75 ते 80 टक्के पेरणी खोळंबल्या आहेत.

(Maharashtra no satisfactory rain sowing has been delayed Farmers in Worry)

संबंधित बातम्या : 

Weather Alert : पुढील 5 दिवसात पाऊस कुठे पडणार? हवामान विभागानं काय सांगितलं, सिंधुदुर्गात पावसाचं कमबॅक

अहमदनगर जिल्ह्यात पावसाची दडी, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट, बळीराजा अडचणीत

केंद्रीय कृषी कायदे मुळातून रद्द करण्याची नि:संदिग्ध भूमिका घ्या!, AIKSCC ची राज्य सरकारकडे मागणी

शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.