नाशिक, भंडाऱ्यात दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू, तर नगरच्या मुळा धरणात पर्यटक वाहून गेला
अहमदनगरला मुळा धरणातील पाण्यात उतरलेला नगर शहरातील एक पर्यटकाचा बुडून मृत्यू झालायं. स्थानिकांच्या मदतीने हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. चेतन कैलास क्षीरसागर वय 38 असे मृताचे नाव असून तो सावेडी भागातील श्रमिक नगर येथील रहिवासी आहे. चेतन क्षीरसागर यांचा हॉटेल व्यवसाय होता.
नाशिक : नाशिक (Nashik) येथे आज सकाळी एक धक्कादायक घटना घडलीयं. पोहण्यास गेलेल्या 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झालायं. नाशिकच्या नंदिनी नदीत मित्रांसह हा 12 वर्षीय मुलगा पोहण्यासाठी गेला होता. मिलिंद नगर भागात ही घटना घडल्याचे कळते आहे. सागर चौधरी (Sagar Chaudhary) असं या 12 वर्षीय मुलाचे नाव आहे. तो इयत्ता 7वीत शिकत होता. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होतेयं. नाशिक जिल्हात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने (Rain) हजेरी लावल्याने नदीच्या पाण्यात मोठी वाढ झालीयं.
नगरला पर्यटकाचा बुडून मृत्यू
अहमदनगरला मुळा धरणातील पाण्यात उतरलेला नगर शहरातील एक पर्यटकाचा बुडून मृत्यू झालायं. स्थानिकांच्या मदतीने हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. चेतन कैलास क्षीरसागर वय 38 असे मृताचे नाव असून तो सावेडी भागातील श्रमिक नगर येथील रहिवासी आहे. चेतन क्षीरसागर यांचा हॉटेल व्यवसाय होता. चेतन समवेत 13 जणांचा ग्रुप धरणावर पर्यटनासाठी आला होता. यावेळी जेवण झाल्यानंतर चेतन धरणाच्या पाण्यात उतरला यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.
नाल्याच्या पाण्यात बुडून 5 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू
आसगाव चौरास येथे नाल्याच्या पाण्यात बुडून 5 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झालायं. खाजगी शिकवणी वर्गासाठी नेहमीप्रमाणे सायकलने आज सकाळी जात असताना आसगांवच्या आठवडी बाजार लगत असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्यासमोरील असलेल्या पुलावरुन वाहणाऱ्या पाण्यामुळे जाताना विद्यार्थ्याचा पडून मृत्यू झाला. त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहुन गेला.
पाण्याच्या पातळीत मोठी वाढ
नाशिक जिल्हासह राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावलीयं. यामुळे नद्यांना पूर आला असून पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झालीयं. याचदरम्यान पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करणाऱ्यांची संख्या वाढली असून यामध्ये अनेकांना आपला जीव देखील द्यावा लागतो. पर्यटक देखील अनेक वेळा उत्साहामध्ये थेट नदी पात्रात किंवा पुराच्या पाण्यात उतरून आपला जीव धोक्यात घालतात.