उद्ध्वस्त ! मालेगावात पत्याच्या बंगल्यासारखी दुमजली हॉटेलची इमारत कोसळली, एकाचा मृत्यू
मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका मालेगावला बसला आहे (Malegaon Ekta Hotel collapsed due to heavy rain).
मालेगाव (नाशिक) : मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका मालेगावला बसला आहे. मालेगावतील एकता हॉटेलच्या दुमजली इमारतीचा पुढचा भाग यामुळे कोसळला आहे. ही हॉटेल मुंबई-आग्रा महामार्गाला खेटून चाळीसगाव फाट्याजवळ आहे. या घटनेत हॉटेल जवळपास उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आहे. ढिगाऱ्याखाली दबून एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच दोन जखमी झाले आहेत (Malegaon Ekta Hotel collapsed due to heavy rain).
दुपारी अडीचच्या सुमारासची घटना
मालेगावात आज दुपारी मुसळधार पाऊस आणि वादळी वारा सुरु होता. पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एकता हॉटेलचा पुढचा भाग कोसळला. यावेळी हॉटेलबाहेर असलेल्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाऊस आणि वारा सुरु होता. अशा परिस्थितीत ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढणं हे मोठं आव्हान होतं. पण तेथील नागरिक हतबल होते. कारण एवढ्या मोठ्या ढिगातून लोकांना सुखरुप बाहेर काढणं शक्य नव्हतं. तातडीने पोलीस आणि अग्निशमन दलाला याबाबत माहिती देण्यात आली (Malegaon Ekta Hotel collapsed due to heavy rain).
घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी
काही वेळाने घटनास्थळावर अग्निशमन दलाची टीम दाखल झाली. त्यांनी बचाव कार्याला सुरुवात केली. पण त्याआधीच शहरातील काही लोकांनी एकत्र येऊन बचाव कार्याला सुरुवात केली होती. दरम्यान बचाव कार्यासाठी घटनास्थळी जेसीबी दाखल झालं. ढिगाऱ्यातून लोकांचा जीव वाचवण्यासाठी मदत कार्य सुरु झालं. यावेळी अग्निशमन जवानांच्या हाथी एक मृतदेह हाती लागला. या घटनेची माहिती संपूर्ण मालेगाव शहरात पसरली. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली.
दोन जण जखमी
संबंधित घटना ज्यावेळी घडली त्यावेळी जेवणाची वेळ टळून गेली होती. त्यामुळे सुदैवाने मोठी जिवीतहानी टळली. तरीदेखील या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले. मात्र, त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. यामध्ये हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच कृषीमंत्री दादा भुसे, प्रांताधिकारी, तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली.
हेही वाचा :
उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब पत्त्यासारखा कोसळला, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?