Malegaon | भक्ष्याचा पाठलाग करताना विहिरीत पडला बिबट्या, अथक प्रयत्नानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला काढले बाहेर
बिबट्या विहिरीत पडल्याची बातमी ऐकल्यानंतर प्रत्येकजण विहिरीकडे धाव घेत होता. यामुळे बघणाऱ्यांची गर्दी अधिकच वाढत असल्याने वन विभागाला बिबट्याला विहिरीतून काढणे अधिकच अवघड होत होते. बिबट्या लोकांची गर्दी पाहून घाबरत होता.
मालेगाव : मालेगावच्या बागलाणच्या दरेंगावमध्ये (Malegaon) एक धक्कादायक घटना घडलीयं. बागलाणच्या दरेंगावमध्ये भक्ष्याचा पाठलाग करतांना बिबट्या 50 फूट खोल विहिरीत पडल्याने एकच खळबळ घडाली. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अगोदर विहिरीत खाट सोडली. बिबट्याला (Leopard) वाचवण्यासाठी वन विभागाने अथक प्रयत्न केले. बिबट्या विहिरीत पडल्याची बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण गावात पसरली आणि बिबट्याला बघण्यासाठी मोठी गर्दी (Crowd) झाली.
बिबट्या विहिरीत पडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली
बिबट्या विहिरीत पडल्याची बातमी ऐकल्यानंतर प्रत्येकजण विहिरीकडे धाव घेत होता. यामुळे बघणाऱ्यांची गर्दी अधिकच वाढत असल्याने वन विभागाला बिबट्याला विहिरीतून काढणे अधिकच अवघड होत होते. बिबट्या लोकांची गर्दी पाहून घाबरत होता. बिबट्याला वाचवण्यासाठी वन विभागाने सुरूवातीला विहिरीत एक खाट सोडले. बऱ्याच वेळानंतर त्या खाटावर बिबट्या बसला.
अथक प्रयत्न करून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला काढले बाहेर
वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्या खाटावर बसल्यानंतर लगेचच विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला बाहेर काढून जीवदान दिले. जसाही बिबट्या विहिरीतून बाहेर आला आणि त्याने धुम ठोकून पळ काढला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. बिबट्या बाहेर आल्यानंतर अनेकांनी टाळ्या वाजून आनंद व्यक्त केला. भक्ष्याचा पाठलाग करताना हा बिबट्या खोल विहिरीत पडल्याचे सांगितले जात आहे. बिबट्या विहिरीच्या बाहेर आल्यावर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.