धार्मिक कार्यक्रमाला जातो म्हणून घरातून बाहेर पडले; नाशिकमध्ये अपघातात 5 तरुण ठार

नाशिक जिल्ह्यातील येवला -मनमाड-अहमदनगर महामार्गावर अनकवाडे शिवारात आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. कंटेनर आणि कारमध्ये जोरदार धडक झाल्याने या अपघातात पाच जण ठार झाले आहेत. हे पाचही तरुण नाशिक जिल्ह्यातील आहेत. या अपघातामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.

धार्मिक कार्यक्रमाला जातो म्हणून घरातून बाहेर पडले; नाशिकमध्ये अपघातात 5 तरुण ठार
Nashik AccidentImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 26, 2023 | 9:00 PM

नाशिक | 26 नोव्हेंबर 2023 : धार्मिक कार्यक्रमाला जातो म्हणून गेलेल्या पाच तरुणांवर काळाने घाला घातला आहे. मनमाडजवळ झालेल्या भीषण अपघातात या पाच तरुणांचा मृत्यू झाला आहे. हे पाचही तरुण नाशिकचे रहिवाशी होते. हा अपघात अत्यंत भीषण होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. या अपघातामुळे वाहतूक कोंडीही झाली होती. मात्र, पोलिसांनी युद्ध पातळीवर ही वाहतूक कोंडी दूर केली.

आज सायंकाळी संध्याकाळी 5 वाजता हा अपघात झाला. मनमाडजवळील अनकवाडे रेल्वे उड्डाणपुलावर कार आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला. दोन्ही गाड्या समोरासमोर आल्याने कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघात इतका भीषण होता की उड्डाणपुलावरच कंटेनर उलटला होता. रोहित धनवटे, श्रेयस धनवटे, ललित सोनवणे, गणेश सोनवणे आणि प्रतीक नाईक हे पाच तरुण या अपघातात ठार झाले आहेत. हे पाचही जण नाशिकचे रहिवासी असल्याची माहिती मिळते.

कंटेनरची जोरदार धडक

रोहित धनवटे, श्रेयस धनवटे, ललित सोनवणे, गणेश सोनवणे आणि प्रतीक नाईक हे पाचही तरुण मनमाड जवळच्या म्हसोबा देवस्थान येथील धार्मिक कार्यक्रमाला गेले होते. धार्मिक कार्यक्रमाला जाऊन संध्याकाळी परत येतो असं त्यांनी घरी सांगितलं होतं. पण येवला मार्गे नाशिकला येत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला.

कंटेनरची जोरदार धडक बसल्याने कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. कंटेनरही पलटला. या अपघातात हे पाचही तरुण जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी कारमधून मृतदेह बाहेर काढले. एव्हाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी हे मृतदेह तात्काळ मृतदेह विच्छेदनासाठी येवला उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.

वाहतूक कोंडी

नाशिक जिल्ह्यातील येवला -मनमाड-अहमदनगर महामार्गावर अनकवाडे शिवारात हा अपघात झाला. या अपघातामुळे कार आणि कंटेनर महामार्गाच्या मध्येच उलटल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. अखेर क्रेनच्या सहाय्याने हा दोन्ही गाड्या बाजूला करण्यात आल्या. त्यामुळे वाहतूक कोंडी सुटली. या अपघातामुळे प्रवाशांना तब्बल तासभर वाहतूक कोंडीत अडकावलं लागलं होतं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.