Manoj Jarange Patil : एकच आधार… मनोज जरांगे मध्यरात्री रुग्णालयात येताच त्याला…

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील काल मध्यरात्री नाशिकला आले होते. यावेळी त्यांनी अपोलो रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मराठा कार्यकर्त्याची भेट घेतली. त्याची विचारपूस केली. तसेच डॉक्टरांशीही चर्चा केली.

Manoj Jarange Patil : एकच आधार... मनोज जरांगे मध्यरात्री रुग्णालयात येताच त्याला...
Manoj Jarange PatilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 18, 2023 | 9:02 AM

चैतन्य गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक | 18 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या मुद्दयावरून अधिकच आक्रमक झाले आहेत. जालन्यातील सभा प्रचंड यशस्वी झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आता थेट प्रस्थापितांवर हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. प्रस्थापितांमुळेच आम्हाला आरक्षण मिळालं नाही. प्रस्थापितांनी मनावर घेतलं तर आम्हाला दोन तासात आरक्षण मिळेल, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. नाशिकमध्ये मीडियाशी संवाद साधताना जरांगे पाटील यांनी थेट मुळावरच घाव घातला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल असेलल्या कार्यकर्त्याची भेट घेतली. विलास गाढे असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या येवला येथे जरांगे पाटील यांची सभा असताना स्वागताच्या वेळी दुर्घटना होऊन काही कार्यकर्ते जखमी झाले होते. यावेळी विलास गाढे हे देखील जखमी झाले होते. गाढे यांच्यावर अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी रात्री 2 वाजता त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. जरांगे पाटील यांनी मध्यरात्री येऊन विचारपूस केल्याने विलास भारावून गेला होता. त्याला अश्रू अनावर झाले.

तर महागात पडेल

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. जखमी तरुणाची मी विचारपूस केली. त्याची प्रकृती बरी आहे. लवकरच त्याला डिस्चार्ज होईल. पण सरकार किती दिवस आम्हाला वेदना देणार आणि आमचे बळी घेणार आहे? हे मात्र समजायला तयार नाही. या आगोदरच आरक्षण दिलं असतं, तर आमच्यावर ही वेळ आली नसती. सरकारने आमच्यावर पूर्वीपासून अन्याय केला. आणखी देखील बळीची अपेक्षा आहे. त्यांनी थांबवलं पाहिजे, नाहीतर महागात पडेल, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.

त्यांनीच वेळ मागितला

आम्हाला समाजाचे सेवक म्हणून काम करायचं आहे. प्रस्थापित लोकांमुळेच आमच्यावर ही वेळ आली. त्यांनी जर मनावर घेतलं तर दोन तासात आरक्षण मिळेल. त्यांनी आमच्याकडून वेळ घेतलाय, आम्ही दिला नाही. त्यामुळे त्यांना आरक्षण द्यावं लागेल. मुख्यमंत्री साहेब शब्द पाळतील. आम्हाला नक्की आरक्षण देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रस्थापितांचा चिल्लरपणा

40 दिवसानंतर आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही. मात्र ही खदखद अनेक वर्षांपासूनची आहे. आता लाट बाहेर पडत आहे. ज्यांना आम्ही प्रतिष्ठित समजत होतो, ते चिल्लरपणा करायला लागले. पैसे कमवण्यासाठी आंदोलन करत नाही, न्याय देण्यासाठी आंदोलन आहे, असं ते म्हणाले.

काही त्यांचे लोक…

त्यांना वाटलं, आम्ही जमीनच विकत घेतली. आमचे कपडे प्रस्थापित लोकांमुळेच फाटले. भुजबळ साहेब यांना व्यक्तिगत विरोध नाही. आम्हाला टीका करायची म्हणून आम्ही आंदोलन करत नाही. पण आरक्षणाला विरोध केला तर कुणालाच सोडणार नाही. ग्राउंड लेव्हलवर मराठा आणि ओबीसी दोन्ही बांधव एकत्र आहेत. काही आमचे आणि काही त्यांचे दोन तीन जण आरक्षण मिळवू देत नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.