नाशिकमध्ये पालिका निवडणुकीआधी मनसे सक्रीय, प्रत्येक मनसैनिकाच्या घरावर झेंडा फडकावणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक आगामी महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सक्रीय झालेली पाहायला मिळतेय. आता मनसेकडून नाशिकमध्ये प्रत्येक मनसैनिकांच्या घरावर मनसेचा झेंडा फडकण्याचं अभियान राबवलं जाणार आहे. मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय झालाय.

नाशिकमध्ये पालिका निवडणुकीआधी मनसे सक्रीय, प्रत्येक मनसैनिकाच्या घरावर झेंडा फडकावणार
MNS
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 11:15 AM

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक आगामी महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सक्रीय झालेली पाहायला मिळतेय. आता मनसेकडून नाशिकमध्ये प्रत्येक मनसैनिकांच्या घरावर मनसेचा झेंडा फडकण्याचं अभियान राबवलं जाणार आहे. मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय झालाय. जिथं मनसैनिक तिथं मनसेचा झेंडा लावण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आलाय.

काळाराम मंदिरासमोर मनसे कार्यकर्त्यांचं अनोखं आंदोलन

नाशिकच्या काळाराम मंदिरासमोर मनसे कार्यकर्त्यांनी अनोखं आंदोलन केलंय. मंदिरासमोर सरकारची आरती करून मनसे कार्यकार्त्यांनी अनोखा निषेध केला. या आंदोलनानंतर नाशिक पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

मनसेची पहिली मोठी घोषणा; नाशिक मनपा निवडणूक अमित ठाकरेंच्या नेतृत्वात लढणार!

दरम्यान, नाशिक महापालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मनसेने आता आणखी एक मोठी घोषणा केलीय. नाशिक महापालिका निवडणूक अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याची घोषणा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली. त्यामुळे नाशिक पालिका निवडणूक मनसेने अधिक गंभीरपणे घेतल्याचं दिसून येतंय.संदीप देशपांडे यांनी मीडियाशी बोलताना ही मोठी माहिती दिली. अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांनी आम्ही नाशिक महापालिका स्वबळावर लढणार आहोत. महापालिका निवडणुका अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात लढवल्या जाणार आहेत, असं स्पष्ट केलंय.

नाशिकमध्ये भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

ठाणे आणि वसई विरार मधील शेकडो भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांनी 10 फेब्रुवारीला मनसेमध्ये प्रवेश केला होता. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला होता. यामध्ये सुनील यादव, राम कदम यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांचा भरणा आहे.

नांदेडमध्ये शिवसेना-काँग्रेस कार्यकर्त्यांचा मनसेप्रवेश

जुन्या नांदेडमधल्या शिवसेना आणि काँग्रेसमध्ये असलेल्या युवकांनी नुकताच मनसेत प्रवेश केला. मनसेचे नांदेड शहर अध्यक्ष बालाजी एकलारे आणि जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंघ जहागीरदार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा झाला. आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मनसे नांदेडमध्ये पक्ष बांधणी करत असल्याचे चित्र आहे.

ठाण्यातही मनसेत येणाऱ्यांची संख्या वाढली

शहापूर तालुक्यातही ऑक्टोबर महिन्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडल्याचे पाहायला मिळाले. मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत शेकडो शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश झाला.

तत्पूर्वी कल्याण-डोंबिवली भागातील शिवसेना आणि भाजपमधील शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला. माजी आमदार प्रकाश भोईर आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख वैभव किणी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. त्यामुळे शिवसेना भाजपला ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भगदाड पडल्याची चर्चा रंगली.

औरंगाबादेतील निष्ठावान शिवसैनिक मनसेत गेल्या वर्षी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच शिवसेना-युवासेना आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या विभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मनसेचा झेंडा हाती धरला होता. तर फेब्रुवारी महिन्यात चंद्रकांत खैरे यांचा विश्वासू शिवसैनिक सुहास दशरथे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर खैरे यांच्या सात निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात पक्षप्रवेश केला होता.

हेही वाचा :

राज ठाकरेंनंतर मनसेच्या नेत्यांचा नाशिक दौरा, कोणते नेते सहभागी, काय निर्णय होणार?

नैसर्गिक नाले बुजवल्यावरुन मनसेचे माजी आमदार आक्रमक, नाशिक महापालिकेत धरणे आंदोलन

मनसेत पक्षप्रवेशाचा धडाका, डॅशिंग नेते अशोक मुर्तडक यांच्या नेतृत्वात कृष्णकुंजवर ‘मेगाभरती’

व्हिडीओ पाहा :

MNS become politically active announce about MNS flag on every supporter house in Nashik

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.