Raj Thackeray | कोणाची इतकी हिम्मत? नाशिकमध्ये कोणी फाडले राज ठाकरेंचे बॅनर?
Raj Thackeray | नाशिक हा मनसेचा गड मानला जातो. त्याच नाशिकमध्ये कोणीतरी राज ठाकरे यांचे बॅनर फाडले. राज ठाकरे इथे येण्याआधी हा सर्व प्रकार घडलाय. मनसैनिकांकडून याचे संतप्त पडसाद उमटू शकतात. नाशिक शहराने अनेकदा मनेसची आक्रमक आंदोलन अनुभवली आहेत.
Raj Thackeray (चंदन पूजाधिकारी) | एकवेळ नाशिक हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला होता. नाशिकच्या तरुणाईमध्ये राज ठाकरे यांच्याबद्दल प्रचंड क्रेझ होती. बदलत्या वेळेनुसार, ही क्रेझ थोडी कमी झाली असली, तरी संपलेली नाही. नाशिकमध्ये राज ठाकरे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. 2009 मध्ये मनसेचे 13 आमदार निवडून आले. त्यातले तीन आमदार नाशिक शहराने दिले होते. नाशिकमध्ये राज ठाकरे यांचा एक दबदबा होता. हा दबदबा थोडा कमी झाला असला, तरी अजूनही त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होते. राज ठाकरे यांचा नाशिक शहरावर सुद्धा तितकच प्रेम आहे. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर याच शहरातून राज ठाकरे यांना भक्कम जनाधार मिळाला होता. त्याच नाशिकमध्ये आज राज ठाकरे यांचे बॅनर फाडण्याची घटना घडली आहे.
राज ठाकरे यांचे लावलेले बॅनर फाडण्यात आले. काळाराम मंदिर परिसरात हे बॅनर लावण्यात आले होते. उद्या राज ठाकरे काळाराम मंदिराला भेट देणार आहेत. तत्पूर्वी काही अज्ञातांनी रात्रीच राज ठाकरे यांचे हे बॅनर्स फाडले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. काळाराम मंदिरात राज ठाकरे दर्शन घेणार आहेत. यंदा मनसेचा वर्धापन दिन नाशिकमध्ये साजरा होणार आहे. त्या निमित्ताने राज ठाकरे तीन दिवस नाशिकमध्ये आहेत. राज ठाकरे यांच्यासह मनसेचे अनेक नेते नाशिकमध्ये दाखल होणार आहेत.
लोकसभेसाठी मनसेचा कुठल्या भागावर फोकस?
राज ठाकरे रविवारी पुण्यात गेले होते. त्यावेळी बैठकीसाठी पदाधिकारी वेळेवर पोहोचले नाहीत, म्हणून राज ठाकर तडक तिथून निघून मुंबईला आले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या मनसेकडून मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. पुणे, नाशिक आणि मुंबई या भागांवर मनसेचा विशेष फोकस आहे. लोकसभेची निवडणूक लढवताना विधानसभेची मोर्चेंबांधणी हा मुख्य उद्देश आहे. शहरी भागात मनसेचा जनाधार आहे. फक्त आता तो मतपेटीत परावर्तित होणं गरजेच आहे.