मशिदीच्या भोंग्यांवरुन माझ्या 17 हजार कार्यकर्त्यांवर केसेस आणि उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी, राज ठाकरे कडाडले

"पुण्यात एक पत्रकार भेटला, त्याने सांगितलं, की, माझी मुलगी लहान आहे. तिला भोंग्यांचा त्रास होत होता. म्हणून मी मशिदीत जाऊन मौलवीला सांगितलं, ते ऐकायला तयार नव्हते. आंदोलन झाल्यानंतर भोंगे बंद झाले" हा किस्सा राज ठाकरे यांनी नाशिकच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना सांगितला.

मशिदीच्या भोंग्यांवरुन माझ्या 17 हजार कार्यकर्त्यांवर केसेस आणि उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी, राज ठाकरे कडाडले
Raj-Uddhav
Follow us
| Updated on: Mar 09, 2024 | 1:27 PM

नाशिक : “आपली भूमिका स्वच्छ होती, आहे. टोल जगभर चालतात. टोलमधून पैसे येतात, ते किती येतात? ते जातात कुठे? हा मुद्दा होता. मुंबई-गोवा रस्ता भीषण आहे. रस्ते नीट करता येत नाही आणि टोल वसूल करताय” अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. “अनेक प्रार्थना स्थळ, मशिदींवरचे भोंगे बंद झाले होते. हे डरपोक सरकार. उद्धव ठाकरे सरकारच्या काळातील भोंग्यांबद्दल बोललो. 17 हजार महाराष्ट्र सैनिकांवर केसेस टाकल्या आणि हे स्वत:ला हिंदुत्वावादी समजतात” अशा शब्दात राज ठाकरे यांनी टीका केली.

“माझ्या 17 हजार कार्यकर्त्यांवर केसेस टाकल्या, काय चूक होती त्यांची?. त्या भोंग्यांचा मुस्लिम समाजालाही त्रास होतो. हा आमचा मामू इथे आलाय, काल तिथे गेले होते. अनेक मुस्लिम बांधव भेटले. पुण्यात एक पत्रकार भेटला, त्याने सांगितलं, की, माझी मुलगी लहान आहे. तिला भोंग्यांचा त्रास होत होता. म्हणून मी मशिदीत जाऊन मौलवीला सांगितलं, ते ऐकायला तयार नव्हते. आंदोलन झाल्यानंतर भोंगे बंद झाले. सरकार ढिली पडल्यावर पुन्हा सुरु. तुमच्या कष्टातून एकदा राज्य हातात द्या, सगळे भोंगे एकसाथ बंद करुन टाकतो. बघू कोणाची हिम्मत होते भोंगे लावायची” असं राज ठाकरे म्हणाले.

समुद्रातील दर्गा पाडल्यावर मुस्लिम समाजाकडून का प्रतिक्रिया आली नाही?

“माहीमच्या समुद्रात अनधिकृत दर्गा बांधत होते. एकारात्रीत तोडायला लावला. त्यानंतर मुस्लिम समाजाकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. कारण त्यांना माहित आहे, हे अनधिकृत आहे. समुद्रात जिथे दर्गा उभारला जात होता, तिथून पोलीस स्टेशन 100 फुटावर आहे, का त्यांच्या लक्षात आलं नाही? महापालिकेच लक्ष का गेलं नाही?” असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.