मनमाड हळहळलं ! विहिरीतून पाणी काढत असताना सासूचा तोल गेला, सूनेचा साडीचा पदर टाकून वाचवण्याचा प्रयत्न, पण…..

पाणी काढतांना तोल जाऊन सासू विहिरीत पडल्याचे पाहून तिला वाचविण्यासाठी गेलेल्या सुनेचाही सासू सोबत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मनमाडमध्ये घडली आहे.

मनमाड हळहळलं ! विहिरीतून पाणी काढत असताना सासूचा तोल गेला, सूनेचा साडीचा पदर टाकून वाचवण्याचा प्रयत्न, पण.....
सासू-सूनेच्या दुर्देवी मृत्यूने मनमाड हळहळलं
Follow us
| Updated on: Jul 27, 2021 | 10:56 PM

रईस बाबू शेख, टीव्ही 9 मराठी, मनमाड (नाशिक) : पाणी काढतांना तोल जाऊन सासू विहिरीत पडल्याचे पाहून तिला वाचविण्यासाठी गेलेल्या सुनेचाही सासू सोबत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मनमाडमध्ये घडली आहे. संबंधित घटना ही मनमाडच्या पांडुरंग नगर भागात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गयाबाई अशोक पवार (वय 50) असं मृत सूनेचं नाव आहे. तर मनीषा सचिन पवार(वय 20) असं सूनेचं नाव आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

नेमकं काय घडलं?

गयाबाई आणि मनीषा या दोघी सासू-सून पाणी आणण्यासाठी शेजारच्या मळ्यात असलेल्या विहिरीवर गेल्या होत्या. या विहिरीला काठडा नाही. त्यामुळे पाणी काढत असताना 50 वर्षीय गयाबाई यांचा विहिरीत तोल गेला. यावेळी तिथे मनीषा व्यतीरिक्त कुणीही तिथे नव्हता. आपली सासू विहिरीत पडल्यानंतर मनीषाने प्रचंड आरडाओरड केली. पण आजूबाजूला कुणीही नव्हतं. त्यामुळे कुणीही मदतीसाठी पोहोचू शकलं नाही.

अखेर मनीषाने सासूला वाचवण्यासाठी साडीचा पदर विहिरीत टाकला. तिने सासूला तो पदर पकडण्यास सांगितलं. पण यावेळी तिचाही विहिरीत तोल गेला. यावेली आजूबाजूला कुणीही नसल्याने त्यांना मदत मिळाली नाही. दोघी सासू-सूनेला पोहता येत नसल्याने त्यांचा विहिरीत बुडून मृ्त्यू झाला.

पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला

बराचवेळ झाला तरी सासू-सून आले नाही म्हणून कुटुंबियांनी घटनास्थळी जाऊन बघितलं. तर तिथे विहिरीत दोघांचे मृतदेह आढळले. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. एकाच कुटुंबातील दोन सदस्यांचा अशा प्रकारे मृत्य झाल्याने पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. संबंधित घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस आल्यानंतर त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यादरम्यान गावकऱ्यांनी दोघी मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. मृतक सून मनीषा ही गरोदर होती. तिला 6 आणि 4 वर्षाची मुलगी आहे. तिचा अशाप्रकारे निधन झाल्याने ही मुलं पोरकी झाली आहेत.

हेही वाचा : वडील-बायकोच्या प्रेमसंबंधाची कुणकुण, जाब विचारल्याने मुलाची हत्या

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.