महायुतीचं जागावाटप जाहीर होण्याआधीच श्रीकांत शिंदे यांची नाशिकमध्ये मोठी घोषणा, भाजपला मान्य असणार?

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. जागावाटपासाठी सध्या मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत बैठकांतं सत्र सुरु आहे. वरिष्ठ पातळीवर यासाठी जोरदार हालचाली सुरु आहेत. पण तरीही जागावाटपाचा तिढा सुटताना दिसत नाही. असं असताना श्रीकांत शिंदे यांनी आज नाशिकमध्ये मोठी घोषणा केली आहे.

महायुतीचं जागावाटप जाहीर होण्याआधीच श्रीकांत शिंदे यांची नाशिकमध्ये मोठी घोषणा, भाजपला मान्य असणार?
shrikant shinde
Follow us
| Updated on: Mar 12, 2024 | 9:31 PM

नाशिक | 12 मार्च 2024 : नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून नाशिकमध्ये मोठी घोषणा करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडून नाशिकमध्ये खासदार हेमंड गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रभू रामाचा धनुष्यबाण नाशिकमध्येच राहणार, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवायचं आहे, असं श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत. नाशिकमध्ये आज कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला श्रीकांत शिंदे यांनी उपस्थितीत लावली. या कार्यक्रमात श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांची नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली.

“हेमंत गोडसे यांनी सांगितलं की, मुख्यमंत्र्यांना सांगा की, प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाण हा नाशिकमध्येच राहीला पाहिजे. मी त्यांना सांगू इच्छितो की, आपला धनुष्यबाण नाशिकमध्येच राहणार आहे. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा हेमंत आप्पा गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पूर्ण बहुमताने पाठवायचं आहे”, असं श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत. श्रीकांत शिंदे यांची ही घोषणा भाजपला मान्य असणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. त्यामुळे भाजप यावर काय प्रतिक्रिया देणार? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भाजपलासुद्धा हवी नाशिकची जागा?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपला देखील नाशिक लोकसभेची जागा हवी आहे. भाजपकडून या जागेवर दावा केला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. भाजपमधील काही जण नाशिकच्या लोकसभेसाठी इच्छुक असल्याचीदेखील चर्चा आहे. विशेष म्हणजे भाजपकडून शांतिगिरी महाराज यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. नाशिक लोकसभेवर हेमंत गोडसे हे गेल्या 10 वर्षांपासून खासदार आहेत. महायुतीच्या जागावाटपावरुन सुरु असलेल्या विविध चर्चांमुळे हेमंत गोडसे यांची धाकधूक वाढली होती. आपलं लोकसभेचं तिकीट कापलं जाणार तर नाही ना? अशी हेमंत गोडसे यांना धाकधूक असल्याची चर्चा होती. पण आता थेट श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी जाहीर केल्याने हेमंत गोडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय?

महायुतीच्या जागावाटपाबाबत सध्या वेगवेगळे दावे केले जात आहेत. महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. पण तरीसुद्धा भाजप 30 ते 32 जागांवर, शिवसेना शिंदे गट 10 ते 12 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 4 ते 6 जागांवर निवडणूक लढवेल, अशी चर्चा सुरु आहे. पण जागावाटपाच्या फॉर्म्युलावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही. तसेच त्याबाबत अधिकृतपणे माहितीदेखील देण्यात आलेली नाही. जागावाटपासाठी सुरु असलेल्या घडामोडी, बैठका आणि चर्चा यावरुन याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचत आहे. त्यामुळे महायुतीचं जागावाटप जाणून घेण्यात सर्वसामान्यांना जास्त औत्सुक्य वाटत आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.